Mumbai Metro One : गर्दीवर उपाय! मेट्रो वनची नवी सुविधा, साडेतीन मिनिटांनी धावणार गाडी, पाहा वेळापत्रक
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवरही मुंबई मेट्रो वनने प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि आधुनिक प्रवासाचा विश्वासार्ह पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
मुंबई: मुंबईत वाढती लोकसंख्या आणि कॉर्पोरेट जगाच्या विस्तारामुळे सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी लोकल ट्रेनप्रमाणेच आता मेट्रोलाही प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. मात्र, या वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवरही मुंबई मेट्रो वनने प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि आधुनिक प्रवासाचा विश्वासार्ह पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी सुटसुटीत वेळापत्रक
घाटकोपर ते वर्सोवा या 11.4 किलोमीटरच्या मार्गावर धावणारी मेट्रो वन दररोज हजारो प्रवाशांना सेवेत ठेवते. पहिली मेट्रो पहाटे 5:30 वाजता वर्सोवा आणि घाटकोपरहून सुटते, तर शेवटची मेट्रो अनुक्रमे रात्री 11:25 आणि 11:50 वाजता धावते.
गर्दीच्या वेळेत सोमवार ते शुक्रवार दरम्यान गाड्यांमधील अंतर फक्त 3.5 मिनिटांचे ठेवण्यात आले आहे, जे प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरतो. तुलनेने प्रवासी संख्या कमी असलेल्या वेळेत हे अंतर 7 मिनिटांपर्यंत वाढवले जाते. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी गर्दीचा अभ्यास करून विशेष वेळापत्रक लागू केले जाते.
advertisement
आरामदायी आणि सुरक्षित डबे
सर्व मेट्रो गाड्या पूर्णपणे एअर कंडिशन्ड असून, प्रवाशांना स्वच्छ, शांत आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो. गाड्यांचे आतील भाग अग्निरोधक (फायर रिटार्डंट) असून, त्यांच्या निर्मितीसाठी स्टेनलेस स्टील कार बॉडीचा वापर केला आहे. त्यामुळे अपघात किंवा आग लागल्यास प्रवाशांचे रक्षण अधिक प्रभावीपणे करता येते.
‘ब्लॅक बॉक्स’मुळे वाढली तांत्रिक सुरक्षा
मुंबई मेट्रो वनने विमानांच्या धर्तीवर प्रत्येक मेट्रो ट्रेनमध्ये ‘ब्लॅक बॉक्स’ बसवून नवा इतिहास घडवला आहे. भारतातील मेट्रो प्रणालीमध्ये अशा प्रकारची सुविधा प्रथमच राबविण्यात आली आहे. या ब्लॅक बॉक्समुळे आपत्कालीन प्रसंगी तांत्रिक तपासणी करणे आणि घटनेचे अचूक कारण शोधणे अधिक सोपे होते. सर्व मेट्रो एअर कंडिशन्ड असून, गाड्यांचे आतील भाग अग्निरोधक आहेत. स्टेनलेस स्टील कार बॉडीमुळे मेट्रो अधिक मजबूत आणि सुरक्षित आहे.
advertisement
सुरक्षा आणि प्रवासी सुविधा
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मेट्रो वनने एण्ड-टू-एण्ड सुरक्षेची प्रभावी व्यवस्था केली आहे. प्रत्येक स्टेशन आणि गाड्यांमध्ये प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी, सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन सहाय्य बटणे आणि सर्व्हिलन्स प्रणाली उपलब्ध आहेत. संशयास्पद प्रवाशांचे प्रोफाइलिंग आणि ट्रॅकिंगद्वारे संभाव्य धोके टाळले जातात.
प्रवाशांसाठी विशेष सुविधा
प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोमध्ये प्रवासी-चालक संवाद प्रणाली बसवण्यात आली आहे. यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी थेट चालकांशी संपर्क साधू शकतात.
advertisement
शारीरिक अडचणी असलेल्या प्रवाशांसाठी स्वतंत्र जागा, व्हीलचेअर वापरणाऱ्यांसाठी सोयीस्कर प्रवेशमार्ग आणि लिफ्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मेट्रो प्रवास सर्वसमावेशक बनला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 9:33 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro One : गर्दीवर उपाय! मेट्रो वनची नवी सुविधा, साडेतीन मिनिटांनी धावणार गाडी, पाहा वेळापत्रक


