Raj Thackeray: 'महाराष्ट्रातील इतर खासदार गप्प का बसले, माहित नाही' राज ठाकरेंनी केलं काँग्रेस खासदाराचं कौतुक

Last Updated:

संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे खासदार गप्प असतात असं चित्र मराठी जनांच्या समोर येत होतं, त्याला तुम्ही या कृतीने छेद दिलात.

(raj thackeray)
(raj thackeray)
मुंबई : मराठी भाषेच्या मुद्यावर सर्व वाद विसरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहे. दोन्ही भावांनी एकत्र मेळावा घेऊन मराठी भाषेसाठी एकत्र राहण्याची ग्वाहीही दिली. तर दुसरीकडे, दिल्लीत लोकसभेमध्ये खासदार निशिकांत दुबे यांना घेराव घालणाऱ्या महाराष्ट्रातील खासदारांचं राज ठाकरेंनी पत्र लिहून कौतुक केलं आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी पत्र लिहून  राज ठाकरेंनी कौतुक केलं आहे.
हिंदी सक्तीच्या मुद्यावर खासदार निशिकांत दुबे यांनी उत्तर प्रदेशमध्ये मराठी लोकांना 'पटक पटक के मारेंगे' असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या परिसरात दुबे यांना घेरलं आणि चांगलं फैलावर घेतलं होतं.  निशीकांत दुबेंना संसदेत घेराव घालत जाब विचारल्याबद्दल राज ठाकरेंनी वर्षा गायकवाडांना अभिनंदनपर पत्र लिहिलं.
advertisement
"उत्तरेतील मुजोरांना दिल्लीत सातत्याने महाराष्ट्र आणि मराठी माणसाची ताकद दाखवलीच पाहिजे, आणि तुम्ही ती दाखवलीत याबद्दल मनापासून आभार आहे. महाराष्ट्रातील इतर खासदार गप्प का बसले माहित नाही, पण तुम्ही हिंमत दाखवलीत याबद्दल तुमचं कौतुक करावे तेवढे कमी आहे. महाराष्ट्रासावी तुमचा संसदेतील आवाज असाच बुलंद राहील अशी आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणूस या समोर कोणतेही वैचारिक मतभेद अत्यंत क्षुद्र आहेत, असं राज ठाकरे या पत्रात म्हणाले.
advertisement
राज ठाकरेंचं पत्र जसेच्या तसे!
खासदार वर्षाताई गायकवाड,
सस्नेह जय महाराष्ट्र!
मराठी माणसांना आपटून आपटून मारू, अशी दर्पोक्ती करणाऱ्या निशिकांत दुबेला तुम्ही संसदेत घेराव घातलात आणि त्याला जाब विचारलात याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा अपमान, त्यावर हल्ली सर्रास अन्याय होत असताना, संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे खासदार गप्प असतात असं चित्र मराठी जनांच्या समोर येत होतं, त्याला तुम्ही या कृतीने छेद दिलात. याबद्दल खरंच मनापासून आभार.
advertisement
महाराष्ट्राला सध्या 'व्यापक भूमिका घेण्याच्या विचारांनी ग्रासलेलं आहे. माझ्या मते हा उभाच ओढवून घेतलेला न्यूनगंड आहे. महाराष्ट्राने देशाचा विचार केला पाहिजे हे खरं आहे कारण देशाचा विचार करावा आणि देशासाठी काही करावं अशी क्षमता असलेली जी काही मोजकी राज्य आहेत त्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. पण म्हणून आपण मराठी आहोत, मराठी जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे, त्यामुळे या जनतेप्रती, या प्रांताबद्दल आपली जबाबदारी पहिली आहे याचा विसर पडायला लागला आहे. यामुळेच सव्वाशे वर्ष हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या, आणि १८५७ चा उठाव असू दे की पुढचा स्वातंत्र्य लढ्याला आकार देणाऱ्यात मरहट्टे होते याचा आपल्याला विसर पडतो आणि म्हणूनच या उत्तरेतील मुजोरांना दिल्लीत सातत्याने महाराष्ट्र आणि मराठी माणसाची ताकद दाखवलीच पाहिजे, आणि तुम्ही ती दाखवलीत याबद्दल मनापासून आभार.
advertisement
महाराष्ट्रातील इतर ४५ खासदार गप्प का बसले माहित नाही, पण तुम्ही हिंमत डाबवलीत याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्रासाठी तुमचा संसदेतील आवाज असाच बुलुंद राहील अशी आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणूस या समोर कोणतेही आपले वैचारिक मतभेद अत्यंत क्षुद्र आहेत ! तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
advertisement
आपला नम्र,
राज ठाकरे
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Raj Thackeray: 'महाराष्ट्रातील इतर खासदार गप्प का बसले, माहित नाही' राज ठाकरेंनी केलं काँग्रेस खासदाराचं कौतुक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement