advertisement

ठरलं! मुंबईला महापौर 'या' दिवशी मिळणार,तारखेबाबत मोठी उपडेट; हालचालींना वेग

Last Updated:

अडीच दशकांपासून मुंबईवर असलेल्या ठाकरे कुटुंबाच्या सत्तेचा गड अखेर कोसळला असून आता महायुतीचा महापौर मुंबईच्या ऐतिहासिक खुर्चीवर विराजमान होणार हे निश्चित झाले आहे.

News18
News18
सुमित सावंत, प्रतिनिधी
मुंबई :  मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक 89 जागा जिंकून भाजप आपल्या स्वप्नाच्या जवळ पोहोचला असला मुंबईच्या महापौरपदासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान घडणाऱ्या घडामोडी पाहता नवीन महापौराची निवड फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. कारण अद्याप मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पद निवडीचा कार्यक्रम जाहीर नाही. त्यामुळे आता महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
advertisement
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेसाठी निवडणूक पार पडली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने 88 आणि शिंदे गटाने 28 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तब्बल अडीच दशकांपासून मुंबईवर असलेल्या ठाकरे कुटुंबाच्या सत्तेचा गड अखेर कोसळला असून आता महायुतीचा महापौर मुंबईच्या ऐतिहासिक खुर्चीवर विराजमान होणार हे निश्चित झाले आहे. मात्र, मुंबईकरांच्या मनात आता एकच प्रश्न आहे की, हा नवा महापौर नेमका कधी निवडला जाणार? फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईला महापौर मिळण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
advertisement

कशी असणार आहे कार्यक्रम?

मुंबई वगळता इतर महापालिकांच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मुंबईत भाजपा आणि शिवसेना (शिंदे) यांची कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणी आणि त्यानंतर महापालिका सचिवालयात नोंदणी झाल्यानंतर कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. गट स्थापनेनंतर 7 दिवसाच्या आत महापौर बसवला जाणार असून नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आयुक्त आणि सचिवांची बैठक होणार आहे. त्याबैठकीनंतर जाहिरात काढून 3 दिवसाची नगरसेवकांना मुदत दिली जाईल, ज्यात महापौर पदासाठी अर्ज नगरसेवकांकडे मागवले जाणार आहे. पुढच्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहे.
advertisement

मुंबईचं महापौरपद का रखडलं?

मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला बहुमत मिळालं असलं तरी एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षे महापौर पद आपल्याला द्यावं, अशी मागणी केली होती. यामुळे महापौर पदावरून पेच निर्माण झाला आहे. भाजपवर दबाव आणण्यासाठी एकनाथ शिंदेंनी हॉटेल पॉलिटीक्स करण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्व नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवलं. पण एकनाथ शिंदे यांच्या दबावतंत्राला फारसं यश मिळालं नसल्याची देखील चर्चा आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
ठरलं! मुंबईला महापौर 'या' दिवशी मिळणार,तारखेबाबत मोठी उपडेट; हालचालींना वेग
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement