Mumbai News: नरिमन पॉईंट ते दहिसर आता सुस्साट प्रवास, लवकरच 18 मार्गिका सेवेत, कसा असणार मार्ग?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai Coastal Road: मुंबईतील सागरी किनारा मार्गावरील सर्व 18 आंतरमार्गिका मे महिन्यात खुल्या हाणार आहेत. त्यामुळे नरिमन पॉइंट ते दहिसर प्रवास सुस्साट होणार आहे.
मुंबई: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील सागरी किनारा मार्गावरील (कोस्टल रोड) शेवटच्या तीन आंतरमार्गिका मे महिन्यात खुल्या हाणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांना हाजी अली, वरळी, वांद्रे येथे जाणे अधिक सोपे होणार असून नरिमन पॉइंट ते दहिसर प्रवास सुस्साट होणार आहे. किनारा मार्गावरील सर्व मार्गिका खुल्या झाल्याने वाहन चालकांना अधिक सुविधा मिळणार आहेत, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलीये.
कोस्टल रोडच्या सर्व मार्गिका सेवेत
कोस्टल रोडवरील हाजी अली ज्यूस सेंटर ते मरिन ड्राइव्ह दरम्यान असणारी 15 वी आंतरमार्गिका नुकतीच खुली करण्यात आली. आता उरलेल्या तीन मार्गिका चालू महिन्यात टप्प्याटप्प्याने खुल्या करण्यात येतील. बरोदा पॅलेस ते लोटस जेट्टी, जे. के.कपूर चौक ते मरिन ड्राइव्ह आणि जे. के. कपूर चौक ते वांद्रे वरळी सी लिंक अशा तीन मार्गिका मे महिन्यात खुल्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे सर्व 18 मार्गिका वाहन चालकांच्या सेवेत येतील.
advertisement
नरिमन पॉईंट ते दहिसरपर्यंत कोस्टल रोड
मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर मुंबईच्या टोकापर्यंत वेगवान प्रवासासाठी किनारी रस्ता प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामध्ये नरिमन पॉईंटपासून दहिसरपर्यंत कोस्टल रोड टप्प्याटप्प्याने बांधण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यांतर्गंत 10.58 किलोमीटरचा सागरी किनारा मार्ग उभारण्यात आला आहे. हा मार्ग शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी वांद्रे सी लिंकच्या टोकापर्यंत असणार आहे.
advertisement
कोस्टल रोडवरून मार्च 2024 पासून फेब्रुवारी 2025 पर्यंत 50 लाखांहून अधिक वाहनांनी ये-जा केलीये. दररोज सरासरी 20 हजारांहून अधिक वाहने या मार्गावर प्रवास करतात. हा मार्ग सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाहन चालकांसाठी खुला आहे. तसेच या मार्गावर एकूण 18 आंतरमार्गिका असून त्यापैकी 15 खुल्या करण्यात आल्या आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 02, 2025 11:39 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: नरिमन पॉईंट ते दहिसर आता सुस्साट प्रवास, लवकरच 18 मार्गिका सेवेत, कसा असणार मार्ग?


