MHADA Lottery: आता निवडा तुमच्या आवडीचं घर, म्हाडाची मोठी घोषणा, लगेच करा अर्ज!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
MHADA Lottery: अनेकांच्या हक्काच्या घराचं स्वप्न म्हाडाच्या लॉटरी योजनेमुळं साकार होतं. आता कोकण मंडळातील 13 हजार 395 घरांची लॉटरी प्रक्रिया सुरू झालीये.
मुंबई: अनेकांच्या हक्काच्या घराचं स्वप्न आता स्वस्तात साकार होणार आहे. कोकण मंडळातील 13 हजार 395 घरांची विक्री म्हाडा करणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विक्री न झालेली ही घरे असून त्यासाठी आता नव्या वेबसाईटची निर्मिती करण्याती आलीये. विशेष म्हणजे ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी नुकताच केला आहे.
कुठे असणार घरे?
कोकण मंडळाच्या विरार बोळींज, खोणी, शिरढोण, गोठेघर, भंडार्ली येथील गृहनिर्माण प्रकल्पातील ही घरे आहेत. यापूर्वी विक्री न झालेली घरे पुन्हा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे संपूर्णपणे ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे ही लॉटरी प्रक्रिया राबवण्यात येणार असून यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप असणार नाही.
advertisement
ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
या प्रणालीनुसार अर्ज नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्डची छायांकित प्रत, स्वयंघोषणापत्र आदी बाबी ऑनलाईन वेबसाईटवर अपलोड करावयाच्या आहेत. आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी होणार आहे. पडताळणीनंतर अर्जदाराचे प्रोफाइल तयार होईल. प्रोफाइल तयार झाल्यानंतर 'प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य' योजनेतील मंडळनिहाय उपलब्ध घरांची माहिती फ्लॅट नंबरसह अर्जदारास मिळणार आहे. या घरांमधून अर्जदारांना मजला व घर आपल्या पसंतीनुसार निवडता येणार आहे.
advertisement
घरे निवडण्याची मुभा
view commentsनव्या वेबसाईटमुळे अर्जदारांना आपल्या पसंतीची घरे निवडता येणार आहेत. अर्जदारांना एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध मिळाला असून वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध असलेली घरे पाहता येणार आहेत. अर्जदारांच्या पात्रता व पसंतीनुसार विशिष्ट घराची निवड करता येईल, अशी माहिती म्हाडा कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिलीये.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 02, 2025 9:01 AM IST


