मुंबईकर कामाची बातमी! एकच तिकीट काढा अन् लोकल ते वॉटर टॅक्सी कशानंही फिरा, नेमका प्लॅन काय?
Last Updated:
Mumbai Transport : मुंबई कनेक्टच्या महाप्रयोगामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा होणार आहे. वॉटर टॅक्सी, लोकलला तीन अतिरिक्त डबे आणि एकाच तिकीटावर महामुंबईत कुठेही प्रवास करता येणार असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई : मुंबई शहराचा विकास वेगाने होत असून येथे स्थलांतरित नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. विशेषतहा नागरिक रोजगाराच्या संधींसाठी मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे येत असल्याने वाढत्या लोकसंख्येला पुरेशी आणि चांगली दळणवळण व्यवस्था उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान बनले आहे.
मुंबईकरांना मोठा दिलासा
मुंबई आणि उपनगरातील करोडो नागरिक लोकल अन् बेस्ट शिवाय मेट्रोन दररोज प्रवास करत असतात. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे या सुविधा गर्दीने भरतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात दररोज नागरिकांना गर्दीतूनच प्रवास करावा लागतो. मात्र आता प्रवाशांसाठी एक दिलासा दायक निर्णय समोर येत आहे, ज्यात त्यांना एकाच तिकीटातून मुंबईतून कुठेही फिरता येणार आहे आणि दुसरा निर्णय काय असेल ते सविस्तर जाणून घेऊयात.
advertisement
महायुतीचा वचननामा काही दिवसांपूर्वी जाहीर झाल्या त्यावेळी मुंबई कनेक्ट या महत्त्वाकांक्षी महाप्रयोगाची घोषणा करण्यात आली. ज्यातून मुंबई शहरातील आणि उपनगरातील दळणवळण व्यवस्था आणखी सक्षम करण्याचे आश्वासन देण्यात आले.
नेमका नागरिकांना फायदा काय होणार?
लोकल ट्रेनला तीन अतिरिक्त डबे जोडणे, वातानुकूलित डब्यांची संख्या वाढवणे आणि सेकंड क्लासच्या तिकीट दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे. याशिवाय वॉटर टॅक्सी, रो-रो सेवा आणि पॅसेंजर बोट्सच्या माध्यमातून जलवाहतुकीवर विशेष भर देण्यात येणार आहे.
advertisement
एकाच तिकीटावर संपूर्ण शहर जोडले जाणार?
एवढंच नाही तर 21 ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार असून नवी मुंबई विमानतळ ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे. ही सेवा स्वस्त, जलद आणि सर्वसामान्यांसाठी परवडणारी असेल.
मुंबईत सुरू असलेल्या वन तिकीट योजनेचा विस्तार करत मेट्रो, मोनोरेल, बस आणि लोकलप्रमाणेच वॉटर टॅक्सीचाही समावेश करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 7:54 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकर कामाची बातमी! एकच तिकीट काढा अन् लोकल ते वॉटर टॅक्सी कशानंही फिरा, नेमका प्लॅन काय?









