Mumbai Fire Video: मुंबईत अग्नितांडव! गोरेगावमधील इमारतीला भीषण आग, 11 व्या मजल्यावर आगीच्या ज्वाळा अन् धुरांचे लोट

Last Updated:

गोरेगाव पूर्वेतील वैष्णव हाइट्स या इमारतीमध्ये शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

Mumbai Fire-
Mumbai Fire-
विजय वंजारा, प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील गोरेगाव भागात एका इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. गोरेगाव पूर्व भागात ही इमारत असून इमारतीच्या अकराव्या आणि बाराव्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीच्या घटनेनंतर मोठी खळबळ परिसरात उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या इमारतीमध्ये मोठ्या संख्येने रहिवासी राहात असल्याची माहिती समोर आली आहे,
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार,  गोरेगाव पूर्वेतील वैष्णव हाइट्स या इमारतीमध्ये शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या 11 व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये ही आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे संपूर्ण इमारतीत धुराचे प्रचंड लोट पसरले. त्यामुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काहींनी प्रसंगावधान दाखवत तातडीने आपले फ्लॅट रिकामे केले, तर काहींना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या, पाण्याचे टँकर आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने आग विझवण्याचे काम सुरू केले आहे. धुराचे प्रमाण अधिक असल्यामुळे श्वास घेण्या, अडचण होत आहे. त्यामुळे अग्निशमन दलाने इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
advertisement

रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली असावी, असा तर्क वर्तवला जात आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र काही फ्लॅटमधील साहित्य जळून खाक झाले आहे. स्थानिक रहिवाशांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  11 व्या मजल्यावर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं. या अपघातात कोणीही जखमी झालं नाही.
advertisement

शॉक सर्किटमुळे आग लागण्याच्या दुर्घटना वारंवार समोर

दरम्यान, गेल्या काही दिवसांत मुंबईत इमारतींना आग लागण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे. शॉक सर्किटमुळे आग लागण्याच्या दुर्घटना वारंवार समोर येत आहेत.
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Fire Video: मुंबईत अग्नितांडव! गोरेगावमधील इमारतीला भीषण आग, 11 व्या मजल्यावर आगीच्या ज्वाळा अन् धुरांचे लोट
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement