भाचीचं लव्ह मॅरेज, मामाने लग्नात घुसून तरुणाला संपवलं, मुंबईला हादरवणाऱ्या घटनेत कोर्टाचा मोठा निर्णय

Last Updated:

भाचीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून मामाने लग्न समारंभाच्या कार्यक्रमात घुसून एकाची हत्या केली होती. या प्रकरणात कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.

News18
News18
मुंबई: भाचीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून, तिला मदत केल्याच्या संशयावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करणाऱ्या मामाला आणि त्याच्या मित्राला विशेष ॲट्रॉसिटी न्यायालयाने जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. जातीय द्वेषातून झालेल्या या हत्याकांडाने चार वर्षांपूर्वी मुंबईत मोठी खळबळ उडवून दिली होती.

नेमकी घटना काय होती?

ही घटना २०२१ मध्ये अँटॉपहिल येथील म्हाडा वसाहतीत घडली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी बालकृष्णन नाडर ऊर्फ बाला (३५) याची भाची संध्या हिने विघ्नेश नावाच्या तरुणाशी प्रेमविवाह केला होता. मात्र, विघ्नेश दुसऱ्या जातीचा असल्याने या विवाहाला मामा बालकृष्णनचा तीव्र विरोध होता. विघ्नेशची बहीण प्रियांका आणि तिचे पती वसंतकुमार यांनी या प्रेमी युगुलाला पळून जाऊन लग्न करण्यास मदत केली, असा दाट संशय बालकृष्णनला होता. याच संशयातून त्याने वसंतकुमार आणि संध्याला ठार मारण्याची धमकीही दिली होती.
advertisement
२०२१ मध्ये एका लग्नानंतर आयोजित कार्यक्रमात वसंतकुमार आपल्या कुटुंबासह सहभागी झाला होता. यावेळी बालकृष्णन नाडर आणि त्याचा मित्र मर्गेश नाडर यांनी पूर्वनियोजित कट रचून वसंतकुमारवर कोयता आणि चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात वसंतकुमारचा जागीच मृत्यू झाला.

न्यायालयातील सुनावणी आणि साक्षीदार

वडाळा टी. टी. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना तातडीने अटक केली होती. विशेष ॲट्रॉसिटी न्यायालयात या खटल्याची सुनावणी पार पडली. सरकारी वकील वीणा शेलार यांनी या प्रकरणात भक्कम पुरावे मांडले. वसंतकुमारचा मित्र, त्याची पत्नी प्रियांका यांच्यासह एकूण १४ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयाने नोंदवल्या. वडाळा टी. टी. पोलिसांनी गोळा केलेले तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुरावे आरोपींना दोषी ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले.
advertisement

न्यायालयाचा निकाल

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून, विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी निकाल दिला. न्यायालयाने बालकृष्णन नाडर आणि मर्गेश नाडर या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा आणि दंड सुनावण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
भाचीचं लव्ह मॅरेज, मामाने लग्नात घुसून तरुणाला संपवलं, मुंबईला हादरवणाऱ्या घटनेत कोर्टाचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement