Mumbai Local : मुंबईचा रँचो! रेल्वे स्टेशनवरच महिलेची प्रसृती, डॉक्टरांच्या व्हिडिओ कॉलच्या मदतीने बाळाचा जन्म, रात्री 1 वाजता काय घडलं?

Last Updated:

Mumbai Local Man helps Women deliver baby : विकास बेद्रे या तरुणाने तात्काळ डॉक्टर मैत्रिण देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेची (Woman delivery At Rammandhir station) प्रसूती केली.

Mumbai Local Man helps Women deliver baby
Mumbai Local Man helps Women deliver baby
Mumbai Rammandhir station Video : धावत्या लोकलमध्ये दररोज अनेक घटना घडतात. मात्र, मुंबईच्या राममंदिर स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर असं काही घडलं की, सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती (Man helps deliver baby) वेदना सुरू झाल्या. राम मंदिर रेल्वे स्थानकावर मेडिकल सुविधा नसताना विकास बेद्रे या तरुणाने महिलेला मदत केली अन् महिलेने व्हिडीओ कॉलच्या मदतीने बाळाला जन्म दिला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल

विकास बेद्रे या तरुणाने तात्काळ डॉक्टर मैत्रिण देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासने यशस्वीरित्या महिलेची प्रसूती केली. झालं असं की, एक गर्भवती महिला बुधवारी रात्री 12.40 च्या सुमारास गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेनने प्रवास करत होती. त्यावेळी अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. डब्ब्यातून प्रवास करणारा विकास दिलीप बेद्रे या तरुणाने लोकलची इम्रर्जन्सी चैन ओढली.
advertisement

महिलेने प्लॅटफॉर्मवर बाळाला जन्म दिला

प्रवाशांनी तात्काळ महिलेला राम मंदिर परिसरात उतरवलं अन् मदतीचा हात पुढे केला. विकास बेद्रे याने तात्काळ डॉ. देविका देशमुख यांना व्हिडीओ कॉल केला अन् झालेली घटना सांगितली. डॉ. देविका देशमुख यांनी तात्काळ मार्गदर्शन केलं. अन् प्रसृतीची संपूर्ण प्रकिर्या सांगितली. त्यानंतर डॉ. देविका देशमुख यांनी विकास बेद्रे यांना मार्गदर्शन केलं अन् महिलेने बाळाला जन्म दिला.
advertisement

पाहा Video

advertisement

आई आणि बाळ दोघंही सुखरूप

दरम्यान, घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने आई आणि बाळाला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यानंतर आता आई आणि बाळ दोघंही सुखरूप असल्याचं पहायला मिळतंय. विकास बेद्रे याने दाखवलेल्या धाडसामुळे सध्या त्याचं कौतुक होताना पहायला मिळतंय.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local : मुंबईचा रँचो! रेल्वे स्टेशनवरच महिलेची प्रसृती, डॉक्टरांच्या व्हिडिओ कॉलच्या मदतीने बाळाचा जन्म, रात्री 1 वाजता काय घडलं?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement