सकाळी-सकाळी मनस्ताप! SBI च्या ग्राहकांचे UPI व्यवहार ठप्प; तांत्रिक अडचण कधी दूर होणार?

Last Updated:
SBI आणि HDFC बँकेच्या UPI सेवांमध्ये तांत्रिक अडचणीमुळे व्यवहार थांबले असून SBI ने UPI Lite वापरण्याचा सल्ला दिला आहे. अडचण १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सोडवली जाईल.
1/5
जर तुमचं UPI किंवा बँकेचं अॅप चालत नसेल तर थांबा, टेन्शन घेऊ नका, याचं कारण म्हणजे बँकेनं याबाबत स्वत: ट्विट करुन दिली आहे. मागच्या काही दिवसांपासून स्टेट बँक ऑफ इंडिया आणि HDFC बँक सतत मेन्टेन्समुळे APP चालत नसल्याचं सांगितलं आहे.

advertisement
2/5
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांना आज सकाळी UPI सेवा वापरताना अडचणी येत आहेत. तांत्रिक कारणामुळे एसबीआयच्या UPI सेवांमध्ये 'इंटरमिटंट टेक्निकल इश्यूज' (म्हणजेच वारंवार बिघाड होत असल्याची माहिती खुद्द बँकेने दिली आहे. यामुळे अनेक ग्राहकांचे UPI व्यवहार तात्पुरते थांबले आहेत.

3/5
एसबीआयने अधिकृत ट्विटर खात्यावरून यासंदर्भात माहिती दिली आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ही तांत्रिक अडचण आज, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८:०० वाजेपर्यंत सोडवली जाण्याची अपेक्षा आहे.

4/5
UPI सेवांमध्ये बिघाड आल्याने ग्राहकांचा होणारा मनस्ताप लक्षात घेऊन, एसबीआयने ग्राहकांना 'UPI Lite' सेवेचा वापर सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. UPI Lite च्या माध्यमातून ग्राहक कोणत्याही व्यत्ययाशिवाय आपले छोटे व्यवहार सुरू ठेवू शकतात.

5/5
बँकेने आपल्या ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर एसबीआयच्या नियमित UPI सेवा पुन्हा सुरळीत सुरू होतील. मागच्या काही दिवसांपासून सतत अडचणी येत असल्याने ग्राहकांनी ट्विट करुन संताप व्यक्त केला आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement