Dawood Ibrahim Property : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची संपत्ती खरेदी करता येणार, कोणत्या जागेचा होणार लिलाव?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Dawood Ibrahim Property : दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्यात येणार असून भूखंड आणि इतर मालमत्तांचा लिलाव होणार आहे.
मुंबई: फरार असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी करता येणार आहे. दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्यात येणार असून भूखंड आणि इतर मालमत्तांचा लिलाव होणार आहे. या मालमत्ता दाऊदसाठी विशेष महत्त्वाच्या आहेत. दाऊद इब्राहिमशी संबंधित रत्नागिरी जिल्ह्यातील १७१ चौरस मीटर शेती जमिनीचा पुन्हा लिलाव होणार आहे. या दाऊदच्या भूखंडासह जप्त केलेल्या चार मालमत्तांची विक्री ४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
advertisement
जानेवारी २०२४ मध्ये, खेड तालुक्यातील मुंबाके गावातील चार मालमत्तांचा लिलाव झाला. या ठिकाणी दाऊद आणि त्याच्या भावंडांचे बालपण गेले होते. या मालमत्तांचा लिलाव होणार आहे. त्यापैकी दोन भूखंड, १.५६ लाख रुपये राखीव किंमत असलेला १,७३० चौरस मीटरचा भूखंड आणि १७१ चौरस मीटरचा भूखंड, दाऊदची आई अमिना बी यांच्या मालकीच्या १५,४४० रुपये राखीव किंमत असलेला शेत जमिनीचा भूखंड हा लिलावासाठी होता.
advertisement
दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी १,७३० चौरस मीटर भूखंडाची बोली ३.२८ लाख रुपयांच्या कोटेशनसह आणि १७१ चौरस मीटर शेती जमिनीची बोली २.०१ कोटी रुपयांच्या कोटेशनसह जिंकली. ही रक्कम किमान किंमतीच्या १३०० पट अधिक होती. लिलावानंतर, श्रीवास्तव यांनी सांगितले की काही कारणांनी आपण एवढ्या रक्कमेची बोली लावली होती. लिलावानंतर श्रीवास्तव यांनी केवळ १,७३० चौरस मीटर भूखंडासाठी ३.२८ लाख रुपयांची पूर्ण रक्कम भरली.
advertisement
इतर दोन मालमत्तांसाठी कोणीही बोली लावणारा पुढे आला नाही. लिलावात १०,४२०.५ चौरस मीटर भूखंडाची किमान बोली रक्कम ९.४ लाख रुपये होती आणि ८,९५३ चौरस मीटर भूखंड ज्याची राखीव किंमत ८ लाख रुपये होती. आता, ४ नोव्हेंबर रोजी, या तीन विक्री न झालेल्या मालमत्ता आणि मुंबाके गावातील २,२४० चौरस मीटर शेती जमीन विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. त्याची राखीव किंमत २.३ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
advertisement
या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव सीलबंद निविदाद्वारे होणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 'सफेमा'कडून ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. एनडीपीएस आणि तस्करी प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव प्रकरणातील सर्व न्यायालयीन कार्यवाही संपल्यानंतर या सफेमाकडून करण्यात येतो. जर विक्रीसाठी असलेल्या चारही मालमत्तांचा यावेळी लिलाव झाला तर त्यांना सुमारे २० लाख रुपये मिळू शकतात. मागील वर्षी ऑनलाइन, सीलबंद लिलाफाद्वारे मालमत्तांची बोली लावण्यात आली.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 9:19 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dawood Ibrahim Property : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची संपत्ती खरेदी करता येणार, कोणत्या जागेचा होणार लिलाव?