Mumbai Local Mega Block: लोकल सेवा कोलमडली, मुंबईकरांचे ‘मेगा’हाल! अनेकांचा पायी प्रवास

Last Updated:

Mumbai Local Mega Block: ऐन प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले असून अनेक प्रवासी रेल्वे ट्रॅकवरून चालत जाताना दिसत होते.

Mumbai Local Mega Block: लोकल सेवा कोलमडली, मुंबईकरांचे ‘मेगा’हाल! अनेकांचा पायी
Mumbai Local Mega Block: लोकल सेवा कोलमडली, मुंबईकरांचे ‘मेगा’हाल! अनेकांचा पायी
मुंबई: देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असतानाच मुंबईकरांचे मात्र पुरते हाल झाले आहेत. मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकलसेवा आज ऐन 26 जानेवारीला विस्कळीत झाली. मध्य रेल्वेचा रात्रकालीन मेगाब्लॉकचा कालावधी संपला तरी सेवा सुरुळीत झालीच नाही. तर पश्चिम रेल्वे देखील उशिराने धावत होती. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. काही ठिकाणी प्रवाशांनी ट्रॅकवरून पायी प्रवास सुरू केल्याचे चित्र होते. त्यानंतर मध्य रेल्वेने सकाळी 8 नतंरही मेगाब्लॉक सुरूच राहणार असल्याचे जाहीर केले. मात्र, यात मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडून पडल्याचे चित्र दिसले.
आज प्रजासत्ताक दिन असल्याने मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आज सकाळी 8 वाजले तरी मुंबईतील लोकल सेवा सुरूच झाली नव्हती. त्यामुळे सर्वच रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. उशिरापर्यंत रेल्वेकडून कोणतीही सूचना न मिळाल्याने प्रवाशांत संभ्रम होता. मात्र, गोंधळानंतर रेल्वेकडून मेगाब्लॉकचा कालावधी वाढवत असल्याची घोषणा करण्यात आली.
advertisement
मध्य रेल्वेनं आधीच केली होती ब्लॉकची घोषणा
मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी ) ते मस्जिद दरम्यान 25, 26, 27 जानेवारी आणि 1, 2, 3 फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक गेण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेने केली होती. या ब्लॉकच्या काळात मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन धीम्या, जलद मार्गावरील लोकल सीएसएमटी ते भायखळा दरम्यान उपलब्ध नसतील, असंही मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं होतं. तसेच मुख्य मार्गावरील भायखळा-सीएसएमटी स्थानकांदरम्यान आणि हार्बर मार्गावर वडाळा रोड ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नसल्याचीही माहिती दिली होती. परंतु, पहाटे पाचला संपणारा ब्लॉक लांबला आणि 8 नंतरही ब्लॉक कालावधी वाढवण्यात आला आहे.
advertisement
पश्चिम रेल्वेवर प्रवाशांचे हाल
पश्चिम रेल्वे मार्गावर देखील माहीम ते वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी शुक्रवारी रात्रीपासून रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला होता. हा ब्लॉक रविवारी पहाटे संपणार होता. परंतु, त्याचे पडसाद उशिरापर्यंत दिसत होते. पश्चिम रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. तसेच लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या.
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local Mega Block: लोकल सेवा कोलमडली, मुंबईकरांचे ‘मेगा’हाल! अनेकांचा पायी प्रवास
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement