दिवाळीच्या खरेदीला लोकलनं जाताय? गैरसोय टाळण्यासाठी वेळापत्रक पाहा, उद्या मेगाब्लॉक
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pratikesh Patil
Last Updated:
Mumbai Mega Block: दिवाळीच्या खरेदीसाठी रविवारी बाहेर जायचा विचार करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लोकलने प्रवास करणार असाल तर आधी वेळापत्रक पाहा.
मुंबई: रविवारच्या सुट्टीदिवशी दिवाळीच्या खरेदीचा प्लॅन करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक पाहावं लागेल. कारण रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आलीये. 27 ऑक्टोबर रोजी अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी योग्य नियोजन करूनच बाहेर पडावं लागेल.
कसे आहेत बदल?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 2.45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबून गंतव्यस्थानावर 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सकाळी 10 .50 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यावर थांबून पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या गाड्या 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
advertisement
या गाड्या बंद राहणार
पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्ग सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत ब्लॉक असणार आहे. यामध्ये नेरुळ/बेलापूर-उरण पोर्ट मार्ग वगळण्यात आला आहे. त्यामुळे पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
advertisement
पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणे येथे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
दरम्यान, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकल चालतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. तसेच या काळात बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा सुरू असतील, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आलीये.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 26, 2024 10:39 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
दिवाळीच्या खरेदीला लोकलनं जाताय? गैरसोय टाळण्यासाठी वेळापत्रक पाहा, उद्या मेगाब्लॉक