धक्कादायक! मुंबईत राजकारण्याच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार, वांद्रे परिसरातील घटना
- Published by:Prachi Amale
Last Updated:
निर्मल नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गंभीर प्रकरणात लैंगिक अत्याचार आणि पीडितेला जीवाची धमकी दिल्याचा आरोप आहे.
मुंबई : वांद्रे येथील अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीवर अत्याचार करणारा नराधम आरोप हा वांद्रे येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या स्थानिक नेत्याच्या मुलगा आहे. ही घटना १ ऑक्टोबर रोजी घडली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी हा 20 वर्षाचा असून तो वांद्रे परिसरातील एका स्थानिक नेत्याचा मुलगा आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी(POCSO कायद्यांतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना १ ऑक्टोबर रोजी घडली असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला ६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. निर्मल नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गंभीर प्रकरणात लैंगिक अत्याचार आणि पीडितेला जीवाची धमकी दिल्याचा आरोप आहे. ही घटना सार्वजनिक पुरुष शौचालयात घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
advertisement
६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे आणि योग्य तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली. तर आरोपीच्या वकिलांनी अटकेचे कारण लेखी स्वरूपात न दिल्याचे सांगत विरोध दर्शविला.दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रकरणाच्या गांभीर्याचा विचार करून पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे म्हटले. त्यानंतर आरोपीला ६ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
advertisement
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबई हे २४ तास जागं असणारं शहर आहे. या शहरात या अत्याचारांच्या घटना वाढू लागल्याने चिंता व्यक्त होते आहे. या घटनेमुळे महिलेंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला सरकार आणि प्रशासनानं गस्त पथक, निर्भया पथक योजना आणल्या आहेत. तरीही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम आहे.अधोरेखित करत आहेत. नराधमावर कठोर कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2025 9:44 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
धक्कादायक! मुंबईत राजकारण्याच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार, वांद्रे परिसरातील घटना