IND vs AUS : आशिया कपच्या हिरोला झालं तरी काय? ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाला झटका
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.कारण आशिया कपमध्ये धावांचा पाऊस पाडणार स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया विरूद्ध फ्लॉप ठरताना दिसतोय.
India vs Australia : ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.कारण आशिया कपमध्ये धावांचा पाऊस पाडणार स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया विरूद्ध फ्लॉप ठरताना दिसतोय. त्यामुळे टीम इंडियाला हा मोठा धक्का बसला आहे.
टीम इंडियाचा युवा खेळाडू अभिषेक शर्माने आशिया कपमध्ये वादळी खेळी केली होती.या स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलिया विरूद्ध सराव सामन्यात त्याने भाग घेतला आहे.या सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया विरूद्ध पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा खेळू शकला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या वनडेत तो शून्यावर बाद झाला. आणि आता तिसऱ्या वनडेत तो 22 धावा करून बाद झाला आहे. त्यामुळे त्याची फलंदाजी पाहून टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.
advertisement
कारण याच अभिषेक शर्माने आशिया कपमध्ये 7 डावांमध्ये 314 धावा केल्या होत्या. या धावा त्याने 44.86च्या सरासरीने केल्या होत्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 200 होता. अभिषेक शर्माने या स्पर्धेत 3 अर्धशतकं झळकावली होती.तसेच त्याने या स्पर्धेत 16 षटकारही ठोकले होते. हे षटकार ठोकून त्यान सन जयसूर्याच्या 14 षटकारांचा विक्रम मोडला होता. यासोबत आशिया कपच्या टी20 च्या एका आवृत्तीत 300 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे.
advertisement
खरं तर आशिया कपमध्ये तो टी20 फॉरमॅटमध्ये खेळला होता आणि आता ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडेचे सराव सामने सूर आहेत. त्यामुळे वनडे फॉरमॅटमध्ये अभिषेक अडखळताना दिसतोय. तसंच अभिषेकची निवड ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वनडे संघात अजिबात झाली नाही. पण टी20 संघात त्याची निवड करण्यात आली आहे. पण पुढे जाऊन जर वनडेसाठी खेळावं लागलं त्याच्यासाठी ही चाचपणी होती.त्यात तो अपयशी ठरला आहे.
advertisement
कसा रंगला सामना
तिसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया अ प्रथम फलंदाजी करताना 317 धावांवर ऑल आऊट झाली होती.त्यामुळे भारत अ समोर 318 धावांचे आव्हान होते.या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 8 विकेट गमावून 322 धावा केल्या आहेत.अशाप्रकारे भारताने 2 विकेटस राखून सामना जिंकला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2025 9:47 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : आशिया कपच्या हिरोला झालं तरी काय? ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाला झटका