Kartiki Ekadashi : उपमुख्यमंत्री दोन,पुजेचा मानकरी कोण? मंदिर समितीपुढे मोठा पेच,विधी व न्याय विभाग काढणार तोडगा

Last Updated:

आषाढी एकादशी झाल्यानंतर आता कार्तिकी एकादशीची तयारी सूरू झाली आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी एकादशीला दोन उपमुख्यमंत्र्‍यापैकी कोणते उपमुख्यमंत्री पाडुरंगाच्या विठुरायाची पूजा करणार?असा प्रश्न मंदिर समितीला पडला आहे.

kartik ekadashi mahapuja
kartik ekadashi mahapuja
Solapur News : विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी सोलापूर:आषाढी एकादशी झाल्यानंतर आता कार्तिकी एकादशीची तयारी सूरू झाली आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी एकादशीला दोन उपमुख्यमंत्र्‍यापैकी कोणते उपमुख्यमंत्री पाडुरंगाच्या विठुरायाची पूजा करणार?असा प्रश्न मंदिर समितीला पडला आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे का राष्ट्रवादीचे अजित पवार? यापैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करायची याची विचारणा आता मंदिर समिती विधी व न्याय विभागाकडे करणार आहे.त्यामुळे विधी व न्याय विभाग कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पंढरीतील विठ्ठल मंदिर समितीच्या आज झालेल्या बैठकीत कार्तिकी एकादशीच्या या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंदिर समितीची बैठक झाली.या बैठकीत उपमुख्यमंत्री दोन, पण पुजेचा मानकरी कोण? अशी चर्चा सूरू होती.
खरं तर आषाढी एकादशीची महापूजा ही मुख्यमंत्र्‍यांच्या हस्ते होते. तर कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्‍यांच्या हस्ते करण्याची परंपरा विठ्ठल मंदिरात आहे. यंदा कार्तिकी एकादशी 2 नोव्हेंबर रोजी आहे. त्यानुसार, कार्तिकीची पूजा शिवसेनेचे एकनाथ शिंदे का राष्ट्रवादीचे अजित पवार? यापैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायची याची विचारणा आता विधी व न्याय विभागाकडे मंदिर समितीकडून करण्यात येणार असल्याचे ठरले आहे.त्यामुळे यावर्षी कार्तिकीच्या पूजेचा मान कोणाला मिळणार हे औत्सुक्याचे असणार आहे.
advertisement
दरम्यान आषाढी यात्रेप्रमाणेच कार्तिकी यात्रेलाही सर्व सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदा कार्तिकी सोहळ्यात 26 ऑक्टोंबरपासून भाविकांना 24 तास दर्शन व्यवस्था सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kartiki Ekadashi : उपमुख्यमंत्री दोन,पुजेचा मानकरी कोण? मंदिर समितीपुढे मोठा पेच,विधी व न्याय विभाग काढणार तोडगा
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement