बुद्धिबळाच्या पटावर मती भ्रष्ट झाली, भारताचा वर्ल्ड चॅम्पियन गुकेशचा राजा प्रेक्षकांमध्ये फेकला, संतापजनक Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
अमेरिकेतील आर्लिंग्टन येथे झालेल्या पहिल्या चेकमेट स्पर्धेत ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराने वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेशला पराभावाचा धक्का दिला.
मुंबई : अमेरिकेतील आर्लिंग्टन येथे झालेल्या पहिल्या चेकमेट स्पर्धेत ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराने वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेशला पराभावाचा धक्का दिला. बुद्धिबळाच्या या स्पर्धेत अमेरिकेने भारताचा 5-0 ने पराभव केला, पण नाकामुराने मॅच संपल्यानंतर केलेल्या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. जपानमध्ये जन्मलेल्या अमेरिकन बुद्धिबळपटू हिकारू नाकामुराने विजयानंतर गुकेशच्या राजाला प्रेक्षकांच्या दिशेने फेकलं.
हिकारू नाकामुराच्या या कृत्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. हिकारूचं हे सेलिब्रेशन अनावश्यक आणि अनादर करणारं असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. नाकामुराच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हिकारूने हे संतापजनक कृत्य केलं असलं तरी गुकेशने मात्र संयम ठेवला, ज्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 'मीा जिंकत होतो, प्रेक्षकांना माहिती होतं की मी जिंकत आहे, म्हणून सर्व आवाज ऐकून मला खरोखर आनंद झाला', अशी प्रतिक्रिया नाकामुराने गुकेशला हरवल्यानंतर दिली आहे.
advertisement
HIKARU THROWS A PIECE TO THE CROWD TO CELEBRATE THE USA 5-0! @GMHikaru
What an event!! 🔥👏 @CheckmateUSAIND pic.twitter.com/LGnM8JLulJ
— Chess.com (@chesscom) October 5, 2025
गुकेश आणि नाकामुराच्या या सामन्यात अनेक तणावपूर्ण क्षणही आले, जेव्हा दोन्ही खेळाडूंनी विजयाच्या संधी निर्माण केल्या, पण अमेरिकेने संधीचा फायदा करून घेतला आणि विजय मिळवला. काळ्या सोंगट्यांसह खेळताना या सामन्यात भारतीय टीमला मोठा पराभव पत्करावा लागला. आता दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात पांढऱ्या सोंगट्यांसह खेळताना भारताला कमबॅक करण्याचं आव्हान असेल.
advertisement
दुसरीकडे अर्जुन एरिगाईसी याचा फॅबियानो कारुआनाकडून पराभव झाला, तर ग्रँडमास्टर दिव्या देशमुखला आंतरराष्ट्रीय मास्टर कॅरिसा यिपकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मास्टर लेव्ही रोझमनने सागर शाहचा पराभव केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2025 9:15 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
बुद्धिबळाच्या पटावर मती भ्रष्ट झाली, भारताचा वर्ल्ड चॅम्पियन गुकेशचा राजा प्रेक्षकांमध्ये फेकला, संतापजनक Video