अनुषा दांडेकरने करण कुंद्राचा वापर केला? म्हणाली,'यूज करो जब तक...'; 9 दिवसांपूर्वीच अभिनेत्याला म्हणालेली 'धोकेबाज'
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Anusha Dandekar on Karan Kundra : अनुषा दांडेकर आणि करण कुंद्रा यांनी काही दिवसांपूर्वीच आपलं नातं संपवलं. पण तरीही ते दोघं चर्चेत आहेत. आता पुन्हा त्यांचं नातं चर्चेत आलं आहे, कारण अनुषाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ती स्पष्टपणे म्हणते की,"तिला कधीच खरं प्रेम झालंच नाही".
Anusha Dandekar Karan Kundra : हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अनुषा दांडेकर एका काळी टीव्ही अभिनेता करण कुंद्राला डेट करत होती. त्यांचं नातं खूपच चर्चेत होतं. दोघांनी एकत्र एक शोही केला होता आणि त्या शोदरम्यान ते खूपच रोमँटिक मोडमध्ये दिसत होते. मात्र, नंतर अचानक त्यांनी ब्रेकअप केलं आणि ते एकमेकांपासून वेगळे झाले. दोघांनीही आपल्या ब्रेकअपवर बराच काळ मौन बाळगलं. पण, अलीकडेच अनुषाने आपल्या पॉडकास्टमध्ये बोलताना आपल्या एक्स बॉयफ्रेंडवर आरोप केला. आता तिचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमधील अनुषाच्या वक्तव्याने करण कुंद्राचे चाहते अक्षरशः संतापले आहेत.
काय आहे प्रकरण?
अनुषा दांडेकरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अनुषा आपल्या ‘सिचुएशनशिप’वर बोलत आहे. व्हिडीओमध्ये अनुषा थेट कबूल करते की, तिला कधीच खरं प्रेम झालंच नाही. सिचुएशनशिपबद्दल बोलताना ती म्हणते,"याचा अर्थ असतो समोरील व्यक्तीच्या आयुष्यात आपली जागा बूक करुन ठेवणं आणि जोपर्यंत आपल्या आयुष्यात योग्य व्यक्ती येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचा वापर करणं".
advertisement
अनुषा दांडेकर काय म्हणाली?
अनुषा दांडेकर या व्हिडीओमध्ये म्हणतेय,"माझ्यासाठी हे एक प्लेसहोल्डरसारखं आहे. तुम्ही त्या खुर्चीवर तोपर्यंत बसलेले असता, जोपर्यंत तुम्हाला एखादा चांगला पर्याय मिळत नाही. हे अगदी असंच आहे, जसं तुम्ही त्या जागेवर एखाद्या व्यक्तीला ठेवताय – ट्रिपसाठी, वाढदिवसासाठी, किंवा शारिरीक गरजेसाठी वापरताय. पण तरीसुद्धा तुम्ही अजूनही एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या येण्याची वाट पाहत असता आणि म्हणता, ‘हे फक्त सिचुएशनशिप आहे’. जेव्हा तो चांगला माणूस भेटतो, तेव्हा तुम्ही ती जागा रिकामी करता आणि मग खऱ्या नात्याची सुरुवात होते. माझ्या मते, हेच सिचुएशनशिप आहे.’ अनुषा दांडेकरला सध्या प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. नेटकरी म्हणत आहेत की, अनुषा करण कुंद्रासोबत कधीच खर्या अर्थाने सीरियस रिलेशनशिपमध्ये नव्हती आणि फक्त त्याचा उपयोग करत होती.
advertisement
करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकर 2016 ते 2019 या कालावधीत रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, 2020 मध्ये दोघांनी अधिकृतपणे ब्रेकअपची घोषणा केली. अनुषापासून वेगळं झाल्यानंतर करण कुंद्रा अभिनेत्री तेजस्वी प्रकाशसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दुसरीकडे, काही काळापूर्वी अनुषाचं नाव 'हीरामंडी' फेम जेसन शाह आणि अभिनेता भूषण प्रधान यांच्यासोबतही जोडण्यात आलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2025 9:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
अनुषा दांडेकरने करण कुंद्राचा वापर केला? म्हणाली,'यूज करो जब तक...'; 9 दिवसांपूर्वीच अभिनेत्याला म्हणालेली 'धोकेबाज'