'जणू मी कलिंगड लावून घेतले'; टेनिस स्टारचं स्टेटमेंट ठरलं ट्रेंडिंग टॉपिक, ब्रेक घेऊन केली Breast Surgery
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Oceane Dodin Breast Augmentation Surgery: फ्रान्सची टेनिसपटू ओशेन डोडिन हिने आपल्या मुलाखतीत धाडसी खुलासा करत सांगितले की तिने व्यावसायिक कारकिर्दीत असतानाच ब्रेस्ट सर्जरी करून घेतली. “जणू मी कलिंगड लावली आहेत!” या तिच्या वक्तव्याने टेनिसविश्वात आणि सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.
मुंबई: फ्रान्सची टेनिसपटू ओशेन डोडिन (Oceane Dodin) हिने अलीकडे दिलेल्या मुलाखतीत एक वैयक्तिक पण धाडसी खुलासा केला आहे. 28 वर्षांची ही खेळाडू जगातील पहिली सक्रिय (Active) टेनिस स्टार ठरू शकते, जिने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत असतानाच स्तनवृद्धी शस्त्रक्रिया (breast augmentation surgery) करून घेतली आहे. तिने ही माहिती फ्रान्समधील RMC Sport या माध्यमाला दिली.
advertisement
टेनिसमधून विश्रांती आणि...
डोडिनने डिसेंबर २०२४ मध्ये टेनिसपासून काही काळ विश्रांती घेतली होती. याचे कारण म्हणजे तिला अंतर्गत कानाच्या (inner ear) समस्येमुळे चक्कर येणे (vertigo) या आजाराने त्रास होत होता. या समस्येमुळे तिच्या संतुलनावर आणि खेळावर परिणाम झाला होता. या नऊ महिन्यांच्या ब्रेकदरम्यान तिने उपचारांवर लक्ष केंद्रित केले आणि त्याच काळात तिने दीर्घकाळापासून हवी असलेली ब्रेस्ट सर्जरी करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
“सर्वजण म्हणाले तू खेळू शकणार नाहीस”
डोडिनने सांगितले की- आजूबाजूच्या लोकांनी तिला ही शस्त्रक्रिया केल्यास ती पुन्हा टेनिस खेळू शकणार नाही असे सांगितले होते. ती म्हणाली, मी आधीच सहा महिन्यांसाठी थांबले होते, म्हणून वाटलं — जे हवंय ते करून टाकावं. सगळे म्हणत होते, ‘तू पुन्हा खेळू शकणार नाहीस,’ जणू मी कलिंगड लावून घेतले आहेत! पण मला कोर्टवर काहीच त्रास होत नाही.
advertisement
advertisement
शस्त्रक्रियेपूर्वी केले नियोजन
डोडिनने सांगितले की- मला खेळताना कोणताही त्रास जाणवत नाही आणि ती विशेष स्पोर्ट्स ब्रा वापरते ज्यामुळे आराम आणि आधार मिळतो. तिने ही शस्त्रक्रिया आपल्या परिचित सर्जन मित्राच्या सल्ल्याने आणि देखरेखीखाली केली. “मी त्याला विचारलं होतं, इम्प्लांट्स कुठे ठेवले तर माझ्या खेळावर परिणाम होणार नाही. त्याने सांगितलं की काही समस्या नाही. जर त्याने उलट सांगितलं असतं, तर मी ही सर्जरी केलीच नसती.
advertisement
नऊ महिन्यांनंतर परतली कोर्टवर
शस्त्रक्रियेनंतर आणि पूर्ण बरे झाल्यावर ओशेन डोडिनने 2025 मध्ये पुन्हा टेनिस कोर्टवर पुनरागमन केलं. सध्या ती फ्रान्समधील ITF W35 Reims स्पर्धेत खेळत आहे. ती या स्पर्धेत पाचवी मानांकित (Seeded No.5) असून, आठवड्याच्या सुरुवातीला तिने दोन सामने जिंकले आहेत. आता ती क्वार्टर फायनलमध्ये पहिली मानांकित खेळाडू मनोन लेओनार्ड (Manon Leonard) हिचा सामना करणार आहे.
advertisement
जर ती ही स्पर्धा जिंकली, तर तो तिच्या कारकिर्दीतील 18वा ITF किताब असेल. डोडिनकडे याआधी एक WTA किताब आहे – जो तिने 2016 मध्ये Tournoi de Québec स्पर्धेत जिंकला होता.
रँकिंग आणि भावी लक्ष्य
दीर्घ विश्रांतीमुळे तिची जागतिक रँकिंग क्रमांक 363 वर घसरली आहे. मात्र ती protected ranking चा लाभ घेत आहे.
तिचे सध्याचे लक्ष्य आहे – 2026 च्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या पात्रता फेरीत (qualifiers) खेळणे. तिने शेवटचा ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये खेळला होता. ज्यात तिने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली होती.
ओशेन डोडिनचा ग्रँडस्लॅम प्रवास
फ्रेंच ओपन – दुसरी फेरी (2017, 2023)
यूएस ओपन – दुसरी फेरी (2015, 2017)
विंबल्डन – सहभाग (2017, 2022, 2024) – मात्र प्रत्येक वेळी पहिल्याच फेरीत पराभव
ऑस्ट्रेलियन ओपन 2024 – चौथी फेरी (सर्वोत्तम कामगिरी)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2025 8:36 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'जणू मी कलिंगड लावून घेतले'; टेनिस स्टारचं स्टेटमेंट ठरलं ट्रेंडिंग टॉपिक, ब्रेक घेऊन केली Breast Surgery