Sayaji Shinde : 'सखाराम बाइंडर' नाटकाचे मानधन पूरग्रस्तांना देणार; सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय

Last Updated:

Sayaji Shinde : 'सखाराम बाइंडर' या नाटकाच्या माध्यमातून मिळणारं मानधन महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतला आहे.

News18
News18
Sayaji Shinde : 'सखाराम बाइंडर' हे एककेळी गाजलेली वादग्रस्त नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आलं आहे. यात मराठी मनोरंजनसृष्टीत दिग्गज अभिनेते सजाजी शिंदे आणि नेहा जोशी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नुकताच नवी दिल्लीत या बहुचर्चित नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडला. अशातच या नाटकाच्या टीमकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पूर परिस्थिती लक्षात देता सयाजी शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. 'सखाराम बाइंडर' या नाटकाच्या 10 प्रयोगांचे मानधन ते महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहेत.
10 प्रयोगाचं मानधन पूरग्रस्तांना देणार : सयाजी शिंदे
"मला परत मी आयुष्यात नाटक करेन, असं वाटलं नव्हतं. पण तरी हे नाटक करायला घेतलं. हे नाटकं इतरं जिवंत, अनेक कालातीत आणि सुंदर आहे. सुंदर विचारांचं आहे. त्यामुळे हे नाटक करावं, असं मला वाटलं. दिल्लीत शुभारंभाचा हाऊसफुल्ल प्रयोग पार पडला. संपूर्ण महाराष्ट्रभर या नाटकाचे प्रयोग होतील. महाराष्ट्रात पूरपरिस्थिती खूप बिकट आहे. त्यामुळे या शुभारंभाच्या प्रयोगाचा नफा आम्ही पूरग्रस्तांना देणार आहोत. तसेच मी माझं पुढील 10 प्रयोगांचं मानधन पूरग्रस्तांना देणार आहे. महाराष्ट्रातील लोकांना माझं आवाहन आहे की पूरपरिस्थितीतील सर्वांना चांगलं जीवन जगता यावं यासाठी पाठिंबा द्या".
advertisement
विजय तेंडुलकर लिखित 50 वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेल्या 'सखाराम बाईंडर' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग नुकताच दिल्लीत संसदेत पार पडला. अभिजीव झुंजारराव यांनी या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर मनोहर जगताप यांनी निर्मिती केली आहे. सयाजी शिंदे, नेहा जोशी, अनुष्का वश्वास, अभिजीत झुंजारराव आणि चरण जाधव या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत. सुमुख चित्रद्वारे या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. संगीत आशुतोष वाघमारे, नेपथ्य सुमीत पाटील, प्रकाशयोजना श्याम चव्हाण, रंगभूषा शरद सावंत आणि वेशभूषा तृप्ती झुंजारराव यांची आहे.
advertisement
सयाजी शिंदे हे नेहमीच समाजीसाठी आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने वेगवेगळ्या माध्यमातून समाजाप्रती काहीना काही करत असतात. त्यामुळे आताही एक रुपये मानधनावर ते 'सखाराम बाइंडर' या नाटकाचे विशेष प्रयोग करत आहेत. कला आणि माणुसकीचा अनोखा संगम सध्या या नाटकाच्या प्रयोगात पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Sayaji Shinde : 'सखाराम बाइंडर' नाटकाचे मानधन पूरग्रस्तांना देणार; सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement