Share Market: महाराष्ट्र सरकारने कंपनीला दिले 712 कोटींचे काम, उद्या शेअर बाजारात ‘पॉवर’ रिटर्न्सचा खेळ

Last Updated:

Share Market: इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील सीगॉल इंडिया लिमिटेडला महाराष्ट्र सरकारकडून 190 मेगावॅट सौर प्रकल्पाचा तब्बल 712 कोटींचा ऑर्डर मिळाला आहे. या करारामुळे कंपनीने रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात पाऊल टाकत मोठा विस्तार साधला आहे.

News18
News18
मुंबई: इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कंपनी सीगॉल इंडिया लिमिटेड (Ceigall India Ltd) कंपनीला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडकडून (MSEDCL) मोठा सोलर प्रोजेक्ट मिळाला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 190 मेगावॅट (AC) क्षमतेचा सोलर फोटोव्होल्टेइक पॉवर प्रोजेक्ट विकसित करण्याचा ऑर्डर मिळाला आहे. हा प्रकल्प मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (MSKVY) 2.0 अंतर्गत उभारला जाणार आहे.
advertisement
या प्रकल्पाची EPC (इंजिनियरिंग, प्रोक्युरमेंट आणि कन्स्ट्रक्शन) किंमत 712.16 कोटी (जीएसटीसह) इतकी ठरवण्यात आली आहे. या मोठ्या ऑर्डरमुळे सोमवार 6 ऑक्टोबरला सीगॉल इंडियाचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
advertisement
महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये प्रकल्प
कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले की- हा प्रकल्प महाराष्ट्रातील चार वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राबवला जाणार आहे. या अंतर्गत कंपनी सोलर पॉवर प्लांट्स उभारेल, त्यांचा संचालन (operation) आणि देखभाल (maintenance) यांची जबाबदारीही कंपनीवरच असेल.
advertisement
तसेच कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) सोबत 25 वर्षांचा पॉवर परचेस अ‍ॅग्रीमेंट (PPA) केला आहे, ज्याअंतर्गत कंपनी वीजपुरवठा करणार आहे.
18 महिन्यांत प्रकल्प पूर्ण करणे अनिवार्य
एक्स्चेंज फाइलिंगनुसार या प्रकल्पांना 18 महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक असेल. त्यानंतर कंपनी 25 वर्षे सलग वीज पुरवठा करणार आहे. कंपनीने हेही स्पष्ट केले आहे की- ऑर्डर Domestic युनिटकडून मिळालेला आहे आणि त्याचा कोणत्याही प्रकारच्या रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शनशी संबंध नाही.
advertisement
रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात मोठं पाऊल
सीगॉल इंडियासाठी हा प्रकल्प रिन्यूएबल एनर्जी (नवीकरणीय ऊर्जा) क्षेत्रात प्रवेश करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारची ही योजना राज्यातील शेतकऱ्यांना ग्रीन एनर्जी आणि स्वस्त वीज उपलब्ध करून देण्यावर केंद्रित आहे.
advertisement
शेअर बाजारातील हालचाल
सीगॉल इंडिया लिमिटेडचे शेअर्स शुक्रवार 3 ऑक्टोबर रोजी एनएसईवर 1.25% घसरणीसह 260.80 या भावावर बंद झाले.
संपूर्ण 2025 वर्षभर कंपनीच्या शेअरचा परफॉर्मन्स कमकुवत राहिला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत या शेअरमध्ये तब्बल 24.7% घसरण झाली आहे.
advertisement
मराठी बातम्या/मनी/
Share Market: महाराष्ट्र सरकारने कंपनीला दिले 712 कोटींचे काम, उद्या शेअर बाजारात ‘पॉवर’ रिटर्न्सचा खेळ
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement