Bharat Gogavale : तटकरेंनी कार्यक्रमातून नाव डावललं, गोगावले कडाडले,'एकदिवस यांनाच...'

Last Updated:

सुनील तटकरे यांच्या कार्यक्रमातील पत्रिकेतून नाव डावलल्याच्या घटनेवर आता भरत गोगावले यांनी भाष्य केले.जे काही झाले ते चुकीचेच झालेले आहे.

Bharat Gogavale  vs Sunil Tatkare
Bharat Gogavale vs Sunil Tatkare
Bharat Gogavale vs Tatkare : राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणाऱ्या एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमातील निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांना डावलण्यात आले होते. या घटनेवर आता भरतशेठ गोगावले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. एकदिवस ह्यांना (तटकरे) डावलेल नाही म्हणजे झाले म्हणून त्यांनी विचार करून पुढे वाटचाल करावी असा सज्जड इशारा गोगावले यांनी तटकरे यांना दिला आहे.
सुनील तटकरे यांच्या कार्यक्रमातील पत्रिकेतून नाव डावलल्याच्या घटनेवर आता भरत गोगावले यांनी भाष्य केले.जे काही झाले ते चुकीचेच झालेले आहे. परंतु आम्ही शासकीय कार्यक्रम लावण्याचे ठरवतोय वरिष्ठ नेत्यांना विचारून तो कार्यक्रम आम्ही लावू असे ते सुरूवातीला म्हणाले.
भरत गोगावले पुढे म्हणाले, असुदे (तटकरे) त्यांच्यावर आम्ही अवलंबून नाही आहोत. आम्ही जनतेवर अवलंबून आहोत. जो पर्यंत जनतेच्या मनामध्ये, जनता जो पर्यंत डावलत नाही. तेव्हा असे किती येतील आणि किती जातील, पण एकदिवस ह्यांना डावलेल नाही म्हणजे झाले म्हणून त्यांनी विचार करून पुढे वाटचाल करावी असा सज्जड इशारा गोगावले यांनी तटकरे यांना दिला आहे.
advertisement
पालकमंत्री पदावरही भाष्य
भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावरही भाष्य केले आहे. गणपती गेले आणि आता नवरात्र पण गेले......आम्ही वाट पाहत नाही आमचे नेते मंडळी वाट पाहत आहे. आम्ही वाट पाहतोय कधी आम्हाला बोलावतात परतू त्यांना काही विचार विनिमय करायचे आहेत ते त्यांना करू द्या आज ना उद्या उद्या न परवा ते होऊन जाईल, असे त्यांनी सांगितले.
advertisement
प्रकरण काय? 
मंत्री भरत गोगावले यांचं नाव पुन्हा निमंत्रण पत्रिकेतून डावलण्यात आले आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे भूमिपूजन होणार आहे. याच कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे आहेत. पण भरत गोगावले यांचे नाव नसल्याने चर्चेला तोंड फुटलं आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर या रखडलेल्या बायपासच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून मंत्री भरत गोगावले यांना पुन्हा एकदा डावलण्याचा प्रकार समोर आलाय.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bharat Gogavale : तटकरेंनी कार्यक्रमातून नाव डावललं, गोगावले कडाडले,'एकदिवस यांनाच...'
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement