Mumbai News: प्रसूतीसाठी महिलेला नेले हात गाडीवरून..! पनवेलमधील धक्कादायक घटना

Last Updated:

Mumbai News: पनवेलसारख्या शहरात अशा स्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध होत नसेल तर नक्की विकास कुणाचा आणि कसला झाला आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

News18
News18
पनवेल : मुंबईप्रमाणे नवी मुंबई आणि पनवेल परिसराचा विकास मोठ्या गतीने होताना दिसत आहे. मात्र, आजही या ठिकाणी सामान्य नागरिकांना साधी आरोग्य सेवा वेळेवर आणि चांगली मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
याबाबत घडले असे की, दोन दिवसापूर्वी आसूडगाव येथील एका डोंबारीचा खेळ करणारी महिला गर्भवती असल्याने तिच्या पोटात दुखू लागले. तिच्या पतीने नियमित तपासणी करणाऱ्या आशा वर्करला फोन करून प्रकारची माहिती दिली, तिने रुग्णवाहिकेसाठी फोन नंबर दिला. पतीने तत्काळ संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र अनेकवेळा फोन करून संपर्क न झाल्याने आणि पत्नीच्या अधिकच पोटात दुखू लागल्याने त्याने आपल्या जवळील दुचाकीला हातगाडी बांधली आणि त्या हातगाडीवर बसवून पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात नेले. रस्त्यात अनेक अडचणी आणि खड्ड्यांचा सामना करीत जीवघेणा प्रवास करत कसेबसे गर्भवती महिला रुग्णालयात पोहचली. महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून दोघेही सुदैवाने सुखरूप आहेत.
advertisement
पनवेलसारख्या शहरात अशा स्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध होत नसेल तर नक्की विकास कुणाचा आणि कसला झाला आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे नेते आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सामान्य नागरिक या निमित्ताने अनेक सवाल उपस्थित करत आहेत. या घटनेने सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून पनवेल मधील आरोग्य यंत्रणा कुचकामी झाली असल्याचे बोलले जात आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: प्रसूतीसाठी महिलेला नेले हात गाडीवरून..! पनवेलमधील धक्कादायक घटना
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement