डेडलाईन ठरली! मुंबईतील शीव रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला गती, वाहतूक कधी सुरू होणार?

Last Updated:

Mumbai News: मुंबईतील शीव हा पूर्व पश्चिम भागांना जोडणारा महत्त्वाचा रेल्वे उड्डाणपूल आहे. आता या पुलाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

डेडलाईन ठरली! मुंबईतील शिव रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला गती, वाहतूक कधी सुरू होणार?
डेडलाईन ठरली! मुंबईतील शिव रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला गती, वाहतूक कधी सुरू होणार?
पुणे: शीव (सायन) पूर्व-पश्चिम भागांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीला आता गती मिळाली आहे. हे काम मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. यानुसार 1 जून 2026 पासून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची योजना महापालिकेकडून आखली गेली आहे. नागपूर आणि अंबाला येथे पुलासाठी लागणाऱ्या तुळ्यांचे उत्पादन सुरू असून त्यावर सतत देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेचे प्रतिनिधी प्रत्यक्ष हजर राहणार आहेत.
या प्रकल्पाचा आढावा अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर आणि पोलीस सहआयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी घेतला. बैठकीत महापालिकेचे व मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुनर्बांधणीतील प्रगती, उर्वरित टप्पे, तांत्रिक अडचणी आणि त्यांची कालमर्यादा यावर सविस्तर चर्चा झाली. बांगर यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी काटेकोर नियोजन, विभागांमधील समन्वय आणि नागरिकांना होणारी संभाव्य गैरसोय कमी ठेवण्याच्या दृष्टीने विशेष सूचना दिल्या.
advertisement
बांगर यांनी स्पष्ट केले की रेल्वे हद्दीतील मुख्य कामे रेल्वे विभाग करणार असून पादचारी भुयारी मार्ग, पोहोच रस्ते आणि पूल जोडणारी इतर कामे महापालिका पाहणार आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भुयारी मार्ग डिसेंबर 2025 पर्यंत तर धारावी बाजूकडील दुसरा भुयारी मार्ग फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण होईल. रेल्वे पुलाच्या उत्तर बाजूस तुळ्या बसवण्याचे काम मार्च 2026 च्या पहिल्या आठवड्यात आणि दक्षिण बाजूस एप्रिल 2026 च्या पहिल्या आठवड्यात केली जाणार आहे.
advertisement
धारावी आणि एलबीएस मार्गाकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्यांची कामे 15 एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. त्यानंतर पूर्वेकडील पोहोच मार्गाचे काम सुरू होणार असून त्यासाठी सुमारे 45 दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे.
सर्व नियोजित कामे वेळापत्रकानुसार पार पडल्यास उड्डाणपूल 31 मे 2026 पर्यंत पूर्णतः तयार होईल आणि 1 जून 2026 पासून नागरिकांसाठी खुला करण्याची शक्यता नक्की असल्याचे बांगर यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे सायन-शीव परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन पूर्व-पश्चिम दळणवळण अधिक सुकर होण्याची अपेक्षा आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
डेडलाईन ठरली! मुंबईतील शीव रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला गती, वाहतूक कधी सुरू होणार?
Next Article
advertisement
Madhuri Dixit On Politics : पुण्यातून निवडणूक लढवण्याची होती चर्चा, खरंच राजकारणात येणार का माधुरी? 'धकधक' गर्लने मौन सोडलं
पुण्यातून निवडणुकीची होती चर्चा, खरंच राजकारणात येणार का माधुरी? अखेर मौन सोड
  • पुण्यातून निवडणूक लढवण्याची होती चर्चा, खरंच राजकारणात येणार का माधुरी? 'धकधक' ग

  • पुण्यातून निवडणूक लढवण्याची होती चर्चा, खरंच राजकारणात येणार का माधुरी? 'धकधक' ग

  • पुण्यातून निवडणूक लढवण्याची होती चर्चा, खरंच राजकारणात येणार का माधुरी? 'धकधक' ग

View All
advertisement