नागपूरमध्ये सोयाबीनला मिळाला 8,000 रु.चा विक्रमी दर, भाव आणखी कडाडणार का? वाचा सविस्तर

Last Updated:

Soyabean Rate Today :  राज्यातील सोयाबीन बाजारात मागील दोन दिवसांपासून दरांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

Agriculture news
Agriculture news
मुंबई : राज्यातील सोयाबीन बाजारात मागील दोन दिवसांपासून दरांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही बाजार समित्यांमध्ये दर स्थिर राहिले असले, तरी अनेक ठिकाणी आवक वाढणे, दर्जानुसार दर ठरणे आणि स्थानिक मागणीतील फरक यामुळे भावात अस्थिरता दिसून आली. 2 आणि 3 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये सोयाबीनला उच्चांकी दर मिळाला तर लासलगाव, अमरावती, जळगावसह काही बाजारांमध्ये दर तुलनेने कमी राहिले.
advertisement
नागपूरमध्ये सर्वाधिक दर
आज 3 डिसेंबर रोजी नागपूर बाजारात लोकल सोयाबीनचे दर 8,000 ते 8,200 रुपयांपर्यंत गेले असून सरासरी दर 8,150 रुपये नोंदला गेला. हा दर राज्यातील सर्व बाजारपेठांमध्ये सर्वाधिक आहे. कमी आवक (फक्त 3 क्विंटल) आणि चांगल्या प्रतीचे सोयाबीन मिळाल्याने दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
advertisement
तर दुसरीकडे जळगाव-मसावत येथे 3 डिसेंबरला सोयाबीनचा दर 3,950 रुपये इतका राहिला. आवक 34 क्विंटल इतकी होती. तर मुरूम बाजारात पिवळ्या जातीची आवक 49 क्विंटल असून दर 4,212 ते 4,432 रुपयांदरम्यान राहिला. सरासरी भाव 4,337 रुपये नोंदला गेला.
advertisement
दरात चढ-उतार स्पष्ट
लासलगाव आणि विंचूर बाजारात 2 डिसेंबरला जवळपास 1,500 क्विंटल जवळपास आवक झाली. मात्र दर 3,000 ते 4,530 रुपयांदरम्यान राहिले. सरासरी दर 4,450 रुपयांच्या आसपास स्थिर होता. मोठ्या आवकीमुळे दरात गडगडाट दिसून आला.
advertisement
छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, राहुरी-वांबोरी, मानोरा, सोलापूर, कोपरगाव, अकोला, यवतमाळ, बार्शी-टाकळी, बुलढाणा, औराद शहाजानी, मुखेड, सेनगाव आदी बाजारामध्ये दर साधारण 4,000 ते 4,600 रुपयांच्या श्रेणीत राहिले. काही बाजारांमध्ये दरात जास्तीत जास्त 4,720 रुपये (बाभुळगाव) तर किमान 3,000 रुपये (बाभुळगाव, आष्टी) असे दर नोंदले गेले.
advertisement
लातूरमध्ये 7,211 क्विंटल अशी मोठ्या प्रमाणात आवक झाली. दर 3,850 ते 4,620 रुपये तर सरासरी 4,400 रुपये नोंदला गेला. या भागात स्थानिक चिंधी बाजार, तेल गिरण्यांची मागणी आणि चांगल्या प्रतीच्या सोयाबीनमुळे दर समाधानकारक आहेत. जालनामध्ये 7,355 क्विंटल आवक असून दर 3,800 ते 5,300 रुपये इतका मोठा फरक दिसून आला. सरासरी दर 4,425 रुपये राहिला.
advertisement
सध्याची एकूण परिस्थिती
राज्यातील सोयाबीन बाजारभाव सध्या 3,000 ते 8,200 रुपयांच्या दरम्यान आहेत. कमी आवक व चांगल्या प्रतीच्या मालाला मोठी मागणी असल्याने काही ठिकाणी दर वाढले, तर मोठ्या आवकीच्या बाजारात भाव स्थिर किंवा घसरलेले दिसत आहेत.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
नागपूरमध्ये सोयाबीनला मिळाला 8,000 रु.चा विक्रमी दर, भाव आणखी कडाडणार का? वाचा सविस्तर
Next Article
advertisement
Madhuri Dixit On Politics : पुण्यातून निवडणूक लढवण्याची होती चर्चा, खरंच राजकारणात येणार का माधुरी? 'धकधक' गर्लने मौन सोडलं
पुण्यातून निवडणुकीची होती चर्चा, खरंच राजकारणात येणार का माधुरी? अखेर मौन सोड
  • पुण्यातून निवडणूक लढवण्याची होती चर्चा, खरंच राजकारणात येणार का माधुरी? 'धकधक' ग

  • पुण्यातून निवडणूक लढवण्याची होती चर्चा, खरंच राजकारणात येणार का माधुरी? 'धकधक' ग

  • पुण्यातून निवडणूक लढवण्याची होती चर्चा, खरंच राजकारणात येणार का माधुरी? 'धकधक' ग

View All
advertisement