मर्सिडीज ओव्हरस्पीड, चाकं घसरली, कोलांट्या खात कार थेट दुसऱ्या मार्गावर, 20 वर्षाच्या तरुणासोबत घडलं भयंकर

Last Updated:

Navi Mumbai News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने पामबीच रोडवर भीषण अपघात झाला. मर्सिडीज कोलांट्या खात दुसऱ्या मार्गावर जाऊन धडकली.

मर्सिडीज ओव्हरस्पीड, चाकं घसरली, कोलांट्या खात कार थेट दुसऱ्या मार्गावर, 20 वर्षाच्या तरुणासोबत घडलं भयंकर
मर्सिडीज ओव्हरस्पीड, चाकं घसरली, कोलांट्या खात कार थेट दुसऱ्या मार्गावर, 20 वर्षाच्या तरुणासोबत घडलं भयंकर
नवी मुंबई: भरधाव मर्सिडीज कारवरील नियंत्रण सुटल्याने पामबीच मार्गावर भीषण अपघात झाला. यामध्ये दोघे मित्र गंभीर जखमी असून मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावले आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यामध्ये भरधाव कार कोलांट्या खात विरुद्ध दिशेच्या दुसऱ्या टोकावरील बॅरिकेडला जाऊन धडकली. सलमान शेख (वय 20) आणि सुफियान शेख (वय 19) अशी जखमींची नावे आहेत.
सीवूड येथे राहणारा सलमान शेख हा वडिलांची मर्सिडीज कार घेऊन मित्र सुफियान शेखसह वाशीच्या दिशेने निघाला होता. पामबीच मार्गावर ज्वेल्स ऑफ नवी मुंबई लगत पहाटे दोनच्या सुमारास भरधाव कारवरील नियंत्रण सुटले. यामध्ये भरधाव कार कोलांट्या खात थेड रस्त्याच्या विरुद्ध बाजूच्या बॅरिकेड्सला जाऊन धडकली. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
पोलिसांत गुन्हा दाखल
सलमान मर्सिडीज वेगाने पळवत होता. तेव्हा त्याचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. गाडीचे चाक घसरल्याने कार अनेक पलट्या मारत बेलापूरकडे जाणाऱ्या लेनवर घुसून दुसऱ्या टोकाच्या बॅरिकेडला धडकली. अपघाताच्या वेळी दोन्ही लेनला इतर वाहने नसल्याने मोठे संकट टळले. मात्र कारमधील दोखे मित्र गंभीर जखमी असल्याने स्थानिकांनी त्यांना कार बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. दोघांवरही उपचार सूरू असून भरधाव कारचालकावर नेरुळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मर्सिडीज ओव्हरस्पीड, चाकं घसरली, कोलांट्या खात कार थेट दुसऱ्या मार्गावर, 20 वर्षाच्या तरुणासोबत घडलं भयंकर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement