नीता अंबानींचा परंपरेला सलाम; स्वदेश फ्लॅगशिपमध्ये भारतीय कलाकार व कारागिरांचा सन्मान, Video
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Nita Ambani Swadesh Flagship Store: इरोसमधील स्वदेशच्या फ्लॅगशिप स्टोअरमध्ये श्रीमती नीता अंबानी यांनी भारतातील कलाकार आणि कारागिरांच्या सन्मानार्थ खास सोहळा आयोजित केला. या संध्याकाळी त्यांनी स्वदेशची मोरपंखी बनारसी साडी व वारसागत दागिने परिधान करून भारतीय हस्तकलेच्या गौरवाला उठावदार रूप दिलं.
नीता अंबानी यांनी इरोसमधील स्वदेशच्या फ्लॅगशिप स्टोअरमध्ये भारतातील कलाकार आणि कारागिरांच्या सन्मानार्थ एक खास उत्सव आयोजित केला होता. या प्रसंगी त्यांनी स्वदेशमधील मोरपंखी निळ्या रंगाची बनारसी साडी परिधान केली होती. या साडीवर अत्यंत सूक्ष्म आणि नाजूक मीना नक्षीकामाची (Meena motifs) कलाकुसर दिसत होती, तसेच पारंपरिक कढुआ विणकाम तंत्र (Kadhua weaving technique) वापरून ती साडी अधिक समृद्ध आणि उठावदार करण्यात आली होती.
advertisement
त्यांच्या या साडीला खास अनुरूप असा मनीष मल्होत्रा यांनी तयार केलेला कस्टम ब्लाऊज त्यांनी घातला होता. त्या ब्लाऊजवर पोल्की बॉर्डरची आकर्षक कड होती, हाताने रंगवलेली देवतांची बटणे होती आणि त्यांच्या वैयक्तिक संग्रहातील विंटेज स्पिनेल टॅसल (vintage spinel tassel) लावलेले होते. ज्यामुळे त्यांच्या पोशाखाला एक वेगळीच शाही आणि भावनिक झळाळी लाभली.
advertisement
आपला हा संपूर्ण लुक त्यांनी अतिशय अभिजात दागिन्यांनी पूर्ण केला. त्यांनी कानात घातलेली अँटिक कुंदन पोल्कीची कानातली शंभर वर्षांहून अधिक जुनी होती, जी त्यांच्या सौंदर्यात एक ऐतिहासिक आणि वारसागत मोहकता आणत होती. त्यासोबतच स्वदेशकडून तयार केलेली हस्तनिर्मित जडाऊ पक्ष्याच्या आकाराची अंगठी (jadau bird ring) त्यांनी घातली होती, जी भारतीय कारागिरीचे वैशिष्ट्य आणि बारकावे दाखवत होती. आणि सर्वात भावस्पर्शी म्हणजे त्यांनी आपल्या आईकडून मिळालेली वारसागत “हाथफूल” परिधान केली होती. हा त्यांच्या कुटुंबातील जपून ठेवलेला अमूल्य वारसा असून त्यांच्या शैलीत परंपरेचा आणि आपुलकीचा सुंदर ठसा उमटवत होता.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2025 10:35 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
नीता अंबानींचा परंपरेला सलाम; स्वदेश फ्लॅगशिपमध्ये भारतीय कलाकार व कारागिरांचा सन्मान, Video

