Panvel News : काम संपवून घरी परतले, मोबाईल हातात घेताच रेल्वे मोटरमनच्या पायाखालची जमीन सरकली
Last Updated:
Panvel News : पनवेलमधील रेल्वे मोटरमन फेसबुकवरील बनावट शेअर मार्केट जाहिरातीच्या जाळ्यात अडकला.नेमका प्रकार कधी सुरु झाला आणि त्याबद्दल मोटरमनसा कधी समजला या बाबत सविस्तर जाणून घेऊयात.
नवी मुंबई : डिजिटल फसवणुकीचे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात आणखी एक धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये समोर आला आहे. रेल्वेत मोटरमन म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला तब्बल 55 लाख 67 हजारांचा फटका बसला असून सोशल मीडियावरील काही जाहिराती कशा प्रकारे लोकांना जाळ्यात ओढतात याची ही थरकाप उडवणारी घटना आहे.
नेमकं घडलं काय?
मोटरमन फेसबुक स्क्रोल करत असताना अचानक एक दिवशी त्याला 'शेअर मार्केटमध्ये कमी गुंतवणूक,जास्त नफा' अशी भुरळ पाडणारी जाहिरात त्यांच्या नजरेस पडली. ज्यात भरघोस परताव्याचे आश्वासन देणारी ही जाहिरात किती घातक ठरू शकते याची कल्पना त्यांना नव्हती. त्यांनी निष्काळजीपणे लिंक उघडली आणि त्याच क्षणापासून त्याला परदेशातील अनोळखी नंबरवरून सतत फोन यायला सुरुवात झाली. स्वतःला ट्रेडिंग तज्ज्ञ सांगणाऱ्या व्यक्तींनी तुम्हाला काहीही करायचे नाही आम्ही तुमचे पैसे दुप्पट करून देतो अशा गोड बोलल्यांनी त्यांना भुलवले.
advertisement
त्यानंतर काही दिवसांत मोटरमनच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्या बनावट तज्ज्ञांनी त्यांना विविध खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. अधिक नफ्याचे खोटे स्क्रीनशॉट, बनावट आकडे आणि सतत तगादा या सर्व गोष्टींनी ते पूर्णपणे त्यांच्या जाळ्यात अडकले. हळूहळू रक्कम वाढत गेली आणि क्षणाक्षणाला तोटा होत असल्याचे सांगून त्यांना आणखी पैसे भरण्यास सांगण्यात आले. शेवटी एकूण 55 लाख 67 हजार रुपये त्यांनी अनोळखी खात्यांवर पाठवले.
advertisement
पण काही दिवसांनंतर कोणताही नफा न दिसता फक्त अजून पैसे द्या असा दबाव येऊ लागला. आपली प्रचंड मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोटरमनने तातडीने पनवेल पोलिसांकडे धाव घेत सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदवली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2025 10:36 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Panvel News : काम संपवून घरी परतले, मोबाईल हातात घेताच रेल्वे मोटरमनच्या पायाखालची जमीन सरकली


