advertisement

Railway Recruitment: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी, 10वी उत्तीर्ण तरुणांना थेट रेल्वेत संधी; अटी अन् अर्ज प्रक्रिया पाहा

Last Updated:

जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेल्वेमध्ये तब्बल 22,000 रिक्त पदांसाठी नोकरभरती होणार आहे. वेगवेगळ्या विभागांप्रमाणे ही नोकरभरती केली जाणार आहे.

Railway Recruitment: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी, 10वी उत्तीर्ण तरुणांना थेट रेल्वेत संधी; अटी अन् अर्ज प्रक्रिया पाहा
Railway Recruitment: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी, 10वी उत्तीर्ण तरुणांना थेट रेल्वेत संधी; अटी अन् अर्ज प्रक्रिया पाहा
मुंबई: रेल्वेत नोकरी करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. जर तुमचे देखील रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेल्वे मंत्रालयामध्ये मोठ्या संख्येवर मेगाभरती केली जाणार आहे. तब्बल 22,000 पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सध्या अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. 29 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख असून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करु शकणार आहेत. त्यामुळे तरूणांनो अजूनही वेळ गेलेली नाही. तात्काळ तुम्ही अर्ज करू शकणार आहेत. नेमकं कोणकोणत्या पदासाठी तरुणवर्ग अर्ज करू शकणार आहेत, जाणून घेऊया....
10 वी पास ते पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. 22,000 रिक्त जागा असून सहाय्यक (ट्रॅक मशीन), असिस्टंट (ब्रिज), ट्रॅक मेंटेनर Gr. IV, असिस्टंट (पी-वे), असिस्टंट (TRD), असिस्टंट लोको शेड (इलेक्ट्रिकल), असिस्टंट ऑपरेशन्स (इलेक्ट्रिकल), असिस्टंट (TL आणि AC), असिस्टंट (C&W), पॉइंट्समन-B, असिस्टंट (S&T) या पदांसाठी भरती केली जाणार आहे. 18 ते 33 वर्षांपर्यंत वयोमर्यादा असून निवड झालेल्या उमेदवाराचे मासिक वेतन 18,000 रूपयांपासून असणार आहे. प्रत्येक पदाला आपआपल्या कामाप्रमाणे मासिक वेतन असणार आहे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या जागा असणार आहेत. प्रत्येक झोनसाठी वेगवेगळ्या जागा असणार आहेत.
advertisement
प्रत्येक पदासाठी देखील सॅलरी स्ट्रक्चर वेगवेगळं असणार आहे. कोणत्या वेतन आयोगप्रमाणे रेल्वे कर्मचार्‍यांना पगार दिला जाणार आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. बातमीमध्ये अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक देखील दिली जात आहे. शिवाय, जाहिरात सुद्धा दिली जात आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून देखील सरकारी नोकरीसाठी अर्ज नसेल दाखल केला, तर तात्काळ अर्ज कराल. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी पुन्हा एकदा व्यवस्थित जाहिरातीची PDF एकदा नक्कीच वाचा. त्याप्रमाणेच ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Railway Recruitment: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी, 10वी उत्तीर्ण तरुणांना थेट रेल्वेत संधी; अटी अन् अर्ज प्रक्रिया पाहा
Next Article
advertisement
Ajit Pawar Plane Crash: अपघाताच्या 1 मिनिट आधीच विमानाला लँडिंगसाठी क्लिअरन्स, पण पायलटने....; Aviation Ministryची पहिली मोठी प्रतिक्रिया
अपघाताच्या 1 मिनिट आधीच विमानाला लँडिंगसाठी क्लिअरन्स, पण पायलटने....
  • Ajit Pawar Plane Crash

  • अपघाताच्या 1 मिनिट आधीच विमानाला लँडिंगसाठी क्लिअरन्स

  • पण पायलटने....

View All
advertisement