School Bus Fare Hike: ST बसनंतर आता शाळेचा प्रवासही महाग, 18 टक्के वाढणार दर
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Sitraj Ramesh Parab
Last Updated:
School Bus Fare Hike: एसटी आणि टॅक्सीच्या भाडेवाढीनंतर सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे. आता शाळाचे प्रवास देखील महागणार आहे.
मुंबई: एसटीच्या भाडेवाढीनंतर रिक्षा आणि टॅक्सीची देखील भाडेवाढ झालीये. त्यामुळे आधीच सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे. अशातच महागाईचा आणखी एक फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. आता शालेय बसच्या भाड्यात देखील 18 टक्क्यांची वाढ होणार आहे, अशी माहिती शालेय बस संघटनेने दिली आहे. त्यामुळे पालकांना आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
स्कूल बस ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी शालेय बसच्या भाडेवाढीबाबत माहिती दिलीये. “शालेय बसच्या उत्पादकांककडून बस आणि सुट्या पार्टच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे बसचा देखभालीचा खर्च वाढला आहे. चांगली सेवा देण्यासाठी तसेच सुरक्षिततेच्या नियमांचे पालन व्हावे म्हणून चालक, महिला मदतनीस आणि व्यवस्थापक यांना देखील पगारवाढ द्यावी लागते. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काही इतर उपाययोजना देखील करणे आवश्यक आहे. पार्किंग शुल्कात देखील वाढ झाली असून आरटीओचा दंड देखील वाढला आहे. त्यामुळे खर्चात भर पडली आहे,” असे गर्ग यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान, सर्वच बांबींसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याने खर्चाची पूर्ता करण्यासाठी शुल्कवाढ करणे हाच पर्याय होता. त्यामुळे शालेय बसची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने सरकारी बसच्या भाड्यात 14.95 टक्के वाढ जाहीर केलीये. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस चालकांनी देखील एकत्रितपणे शैक्षणिक वर्ष 2025 साठी स्कूल बसच्या शुल्कात 18 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे स्कूल बस ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.
advertisement
एसटी बस, रिक्षाची भाडेवाढ
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जानेवारीच्या शेवटी बसच्या तिकीट दरांत जवळपास 15 टक्क्यांची दरवाढ केलीये. तर मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी भाडेवाढ केलीये. त्यापाठोपाठ आता शाळेचा प्रवास देखील महागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 05, 2025 8:48 AM IST