Lok Sabha Election Result : इंडिया आघाडीत पीएम पदाचा उमेदवार कोण? शरद पवारांनी केला मोठा खुलासा
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे, त्यानंतर आता वेध लागले आहेत ते म्हणजे सत्ता स्थापनेचे
मुंबई, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे, त्यानंतर आता वेध लागले आहेत ते म्हणजे सत्ता स्थापनेचे. भाजपकडून चारशे पारचा दावा करण्यात येत होता मात्र इंडिया आघाडीने यावेळी जोरदार मुसंडी मारली. एनडीएला लोकसभेच्या केवळ 292 च जागा मिळवता आल्या आहेत. भाजपला (BJP) पूर्ण बहुमत नसल्यानं आता सत्तास्थापनेसाठी मित्र पक्षांची गरज लागणार आहे. तर दुसरीकडे इंडिया (INDIA) आघाडीकडून देखील सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
'आज बैठक आहे, बैठकीला येण्याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष खरगेंनी फोन केला.चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार यांच्याशी बोलणार नाही. आजच्या बैठकीनंतर पीएम पदाबाबत ठरेल. अजून ठरवलं नाही मग कोणाचं नाव का घ्यायचं? माझं वयैक्तिक मत महत्त्वाचं नाही. नितीश कुमारांशी संपर्क करण्याची अजून आमच्यात चर्चा नाही, बैठकीत रनणिती ठरेल' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यात मोदी विरोधात लाट होती असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये ४० पैकी ३० जागा एनडीएने जिंकल्या आहेत. तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूला १२ जागा जिंकता आल्या आहेत. लोकसभा निवडणूक निकालानंतर नितीश कुमार एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत. बिहारचे विरोधी पक्षनेते असलेल्या तेजस्वी यादव यांच्यासोबत मुख्यमंत्री नितीश कुमार एकाच विमानाने दिल्लीला गेले. त्यांचा विमानातील फोटोही समोर आला आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव पटनाहून विस्ताराच्या UK ७१८ विमानाने दिल्लीत पोहोचले.
Location :
Bid,Bid,Maharashtra
First Published :
June 05, 2024 12:51 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Lok Sabha Election Result : इंडिया आघाडीत पीएम पदाचा उमेदवार कोण? शरद पवारांनी केला मोठा खुलासा