Mumbai News : मुंबई हादरली! घरी जाण्यासाठी स्टेशनबाहेर पडत होती, त्याच क्षणी घडलं भयंकर! LLT स्टेशनबाहेर..
Last Updated:
Mumbai Shocking Crime : मुंबई शहरातील एका स्टेशनवर महिलेसोबत धक्कादायक प्रसंग घडलेला आहे. नेमके या घटनेत पुढे काय झाले ते समजण्यासाठी बातमी सविस्तर वाचा.
मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात गुरुवारच्या पहाटे घडलेल्या या प्रकारानं सर्वत्र खळबळ उडाली आहे.
ट्रेनमधून उतरताच महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, विरार येथे वास्तव्यास असलेल्या 39 वर्षीय सोनी मधेशिया या पहाटे मुंबईत पोहोचल्या. प्रवासानंतर त्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून कुर्ला रेल्वे स्टेशनच्या दिशेने चालत जात होत्या. त्या वेळेस संपूर्ण परिसरात अंधार होता आणि गर्दीही नव्हती. याच संधीचा फायदा घेत दोन अनोळखी चोरांनी अचानक त्यांच्या वाटेत आले आणि महिलेला काही समजण्याआधी एकाने चाकू बाहेर काढून त्यांच्याकडे रोखला.
advertisement
चाकूचा धाक दाखवत त्यांनी महिलेला काहीही आवाज न करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या आणि हादरलेल्या महिलेला काहीही करता आले नाही. दरम्यान दुसऱ्या आरोपीने क्षणात त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले घटना इतकी लवकर घडली की महिलेने मदतीसाठी ओरडण्याआधीच दोन्ही आरोपीने पळ काढला.
घटनेनंतर महिलेने थेट नेहरूनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2025 11:43 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : मुंबई हादरली! घरी जाण्यासाठी स्टेशनबाहेर पडत होती, त्याच क्षणी घडलं भयंकर! LLT स्टेशनबाहेर..


