2 तास 20 मिनिटांची नवी फिल्म, शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा ट्विस्ट, रिलीज होताच मोडलेत 15 चित्रपटांचे रेकॉर्ड
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
New Bollywood Release Movie : बॉलिवूडच्या नुकत्याच रिलीज झालेल्या एका चित्रपटाने रिलीज होताच तब्बल 15 चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. 80 कोटींच्या बजेटच्या या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
advertisement
सहा वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या सुपरहिट सिनेमाला प्रेक्षकाचं चांगलच प्रेम मिळालं होतं. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगली कमाई केली. आता या बहुचर्चित सिनेमाचा सीक्वेल रिलीज झाला असून तोही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या नव्या सिनेमाची स्टारकास्ट, दिग्दर्शन आणि म्युझिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. ओपनिंग डेलाच या चित्रपटाने अनेक सिनेमांना मागे टाकलं आहे.
advertisement
advertisement
'दे दे प्यार दे 2' या चित्रपटात अजय देवदन, रकुल प्रीत सिंह, आर. माधनव, मिजान जाफरी आणि इशिता दत्ता हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाच्या कथानकात अजय देवगन म्हणजेच आशिष रकुल प्रीत सिंह म्हणजेच आयशाच्या प्रेमात पडताना दिसत आहे.
advertisement
‘दे दे प्यार दे 2’ मध्ये आशिष, आयशाशी लग्न करण्यासाठी तिचे वडील रज्जी खुराना (आर. माधवन) यांना भेटतो, पण ते दोघांच्या लग्नासाठी अजिबात तयार नसतात. त्यांना वाटते की आयशाचे लग्न त्यांचा मित्र समीर खन्ना (जावेद जाफरी) यांचा मुलगा आदित्य (मिझान जाफरी) याच्यासोबत व्हावे, आणि त्यासाठी ते अनेक युक्त्या लढवतात. चित्रपटाची कहाणी अशाच अनेक जबरदस्त टर्न्स आणि ट्विस्ट्ससह पुढे सरकते आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. या चित्रपटालाही त्याच्या पहिल्या पार्टप्रमाणेच प्रेक्षक आणि समीक्षक यांच्याकडून भरपूर प्रेम मिळत आहे.
advertisement
'दे दे प्यार दे 2' या चित्रपटाची निर्मिती 80 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 8.50 कोटींची कमाई केली. एवढेच नाही, या चित्रपटाने पहिल्या दिवशीच यंदा रिलीज झालेल्या 15 चित्रपटांच्या कमाईचे रेकॉर्ड मोडले. यामध्ये ‘द ताज स्टोरी’, ‘बाहुबली: द एपिक (हिंदी)’, ‘होमबाउंड’, ‘वन बॅटल आफ्टर अनदर’, ‘मिराई’, ‘द बंगाल फाइल्स’, ‘परम सुंदरी’, ‘कुली ’, ‘सन ऑफ सरदार 2’, ‘धडक 2’, ‘निकिता रॉय’, ‘मालिक’, ‘आंखों की गुस्ताखियां’, ‘सुपरमॅन’ आणि ‘मेट्रो इन डिनो’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
advertisement
‘दे दे प्यार दे 2’ हा चित्रपट भारतातील PVR, INOX, Cinepolis यांसारख्या मल्टिप्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणावर रिलीज करण्यात आला आहे. OTT रिलीजबद्दल बोलायचे झाल्यास, रिपोर्ट्सनुसार नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे डिजिटल राइट्स विकत घेतले आहेत. रुपेरी पडद्यावर जादू दाखवल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.


