Pune Navale Bridge Accident : 2 वर्षांपूर्वी लग्न, 3 महिन्यांचं बाळ… नवले पूल अपघातात मराठी अभिनेत्याचं आयुष्य संपलं

Last Updated:
Pune Navale Bridge Accident : पुण्यातील नवले ब्रीजवर झालेल्या अपघतात एका मराठी अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. दोन ट्रकच्या धडकेत कारचा चेंदामेंदा झाला आहे. अभिनेत्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
1/7
पुण्यातील नवले ब्रीजवर झालेल्या भीषण अपघाताने सर्वांना हादरवून सोडलं. या दुर्घटनेत 30 वर्षांचा मराठी अभिनेता धनंजय कोळीचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

advertisement
2/7
गुरुवारी झालेल्या या भीषण धडकेत मोठ्या वाहनांच्यामध्ये धनंजयची छोटी कार अडकली. कारचा चक्काचूर झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

3/7
अभिनेता धनंजय कोळीच्या अपघाती मृत्यूपश्चात त्याची तीन महिन्यांची मुलगी, बायको आणि आई वडील असं कुटुंब आहे.  धनंजयचं लग्नाला फक्त 2 वर्षं झाली होती. संसार आत्ताच सुरू झाला होता. स्वप्नं रुजत होती. पण नशीबाचे फासे फिरले आणि धनंजय तीन महिन्याच्या लेकीला सोडून कायमचा निघून गेला.

4/7
तीन महिन्यांपूर्वीच तो बाबा झाला होता. छोट्या बाळाचं हास्य, पहिलं बाळंतपण, पहिलं बाबा म्हणणं… सगळं अनुभवायचं बाकी होतं. अपघात झाला त्यावेळी धनंजयची पत्नी आणि तीन महिन्याचा मुलगा लातूरमध्ये होते.

5/7
धनंजय मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरचा होता. गेल्या काही काळापासून पुण्यात आई-वडिलांकडे यायचा. अपघाताच्या दिवशीही तो आई-वडिलांकडे येत होता तेव्हा रस्त्यात त्याचा अपघात झाला.

6/7
धनंजयचं इन्स्टाग्राम चेक केल् त्याने स्वतः ची ओळख एक्टर अशी दिली आहे.  काही नाटकं, काही लहान भूमिका त्याने केल्याचं दिसतंय.

7/7
अभिनयासोबत त्याने 6 महिन्यांपूर्वी वाहतूक व्यवसाय सुरू केला होता. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी, बाळाच्या भविष्यासाठी तो अनेक कामं एकटाच सांभाळत होता.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement