रब्बी पीक स्पर्धा सुरू! विजेत्याला किती रुपयांचे बक्षीस? नोंदणी कुठे कराल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : राज्यातील कृषी उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुधारित बियाणे आणि क्षेत्रनिहाय योग्य पद्धतींचा अवलंब करून अनेक शेतकरी उत्पादनात उल्लेखनीय वाढ साध्य करत आहेत.
मुंबई : राज्यातील कृषी उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुधारित बियाणे आणि क्षेत्रनिहाय योग्य पद्धतींचा अवलंब करून अनेक शेतकरी उत्पादनात उल्लेखनीय वाढ साध्य करत आहेत. अशा प्रयोगशील आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांचे मनोबल वाढावे आणि इतर शेतकऱ्यांमध्येही प्रेरणा निर्माण व्हावी, यासाठी राज्य सरकारने पीकस्पर्धा योजना राबविली आहे. ही योजना केवळ शेतकऱ्यांच्या कौशल्याला वाव देत नाही, तर राज्याच्या एकूण उत्पादनवाढीतही महत्त्वाची भूमिका बजावते.
पीकस्पर्धा योजना राबविण्याचा उद्देश असा की, प्रत्येक तालुका व जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी पुढे यावेत आणि त्यांच्या पद्धतींचे मार्गदर्शन आसपासच्या शेतकऱ्यांना मिळावे. त्यामुळे केवळ उत्पादनवाढ होत नाही, तर तंत्रज्ञानाचा प्रसारही वेगाने होतो. या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांमध्ये आरोग्यदायी स्पर्धा निर्माण होते आणि शेतीविषयक नवकल्पनांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळते.
रब्बी हंगाम २०२४ साठीही मागील वर्षाप्रमाणेच तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर पीकस्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस. असे यावर्षी स्पर्धेत एकूण पाच पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
advertisement
पात्रता निकष
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही महत्त्वाचे नियम निश्चित करण्यात आले आहेत. जसे की,
१) शेतकऱ्याच्या नावे जमीन असणे आणि त्याच जमिनीची तो स्वतः शेती करीत असणे आवश्यक.
२) शेतकरी इच्छेनुसार एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकतो.
३) संबंधित पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड केलेली असावी.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)
advertisement
प्रवेश शुल्क भरल्याचे चलन
७/१२ आणि ८-अ उतारा
जातीचा दाखला (आदिवासी शेतकऱ्यांसाठी आवश्यक)
७/१२ उताऱ्यातील घोषित क्षेत्राचा नकाशा
बँक खात्याच्या पहिल्या पानाची प्रत
अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे.
प्रवेश शुल्क किती?
सर्वसाधारण गट : रु. ३००/-
आदिवासी गट : रु. १५०/-
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2025 11:16 AM IST


