Mumbai: मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, स्पाईस जेट विमानाचं चाक निखळलं, LIVE VIDEO

Last Updated:

मुंबई विमानतळावर स्पाईस जेट विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. यावेळी विमानाचं चाक निखळल्याचं समोर आलं आहे.

मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई विमानतळावर स्पाईस जेट विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. यावेळी विमानाचं चाक निखळल्याचं समोर आलं आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२ सप्टेंबर रोजी स्पेसजेट Q400 विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. यावेळी विमानाचं चाक निखळल्याचं समोर आलं आहे. स्पाईस जेटचं हे विमान कंडलाहून मुंबईला आलं होतं. जेव्हा कांडला विमानतळावरून विमानानं उड्डाण भरलं तेव्हा तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आलं.
कंडला विमानतळावरून उड्डाण भरल्यानंतरच विमानाचं चाक निखळलं असल्याचं समोर आलं होतं. पण, स्पाईस जेटच्या पायलटने सुखरूपपणे मुंबईत लँडिंग केलं. या दुर्घटनेमध्ये कुणालाही दुखापत झाली नाही. सर्व प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवण्यात आलं  आहे.
advertisement
स्पाईस जेट विमानाकडून याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. १२ सप्टेंबरला कंदला विमानतळावरून या विमानाने मुंबईकडे येण्यासाठी टेकऑफ केलं होतं. पण, टेकऑफ केल्यांनंतर चाकामध्ये बिघाड झाला होता. पण, मुंबईत विमानाने सुखरूपपणे लँडिंग केलं आहे. सगळे प्रवासी सुखरूप आहे, अशी माहिती स्पाईस जेटने दिली आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, स्पाईस जेट विमानाचं चाक निखळलं, LIVE VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement