भाऊबीजेसाठी बहिणीला काय गिफ्ट द्यायचं? 'ह्या' घ्या आयडिया; 75 रुपयांपासून मिळतायत वस्तू
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
दिवाळी आणि भाऊबीज सणाच्या निमित्ताने प्रत्येक जण आपल्या भाऊ किंवा बहिणीसाठी खास गिफ्ट शोधत असतो. पण नेमकं कोणतं गिफ्ट योग्य ठरेल, याचा प्रश्न नेहमीच पडतो.
मुंबई: दिवाळी आणि भाऊबीज सणाच्या निमित्ताने प्रत्येक जण आपल्या भाऊ किंवा बहिणीसाठी खास गिफ्ट शोधत असतो. पण नेमकं कोणतं गिफ्ट योग्य ठरेल, याचा प्रश्न नेहमीच पडतो. यावर उपाय म्हणून गोरगावच्या 28 वर्षीय धनश्री सावंत यांनी एक वेगळी आणि आकर्षक गिफ्ट आयडिया सुरू केली आहे.
धनश्री सावंत यांच्या या व्यवसायात ग्राहकांच्या मागणीनुसार किंवा त्यांच्या आवडीनुसार गिफ्ट तयार केले जाते. हॅम्पर्समध्ये विविध प्रकारच्या वस्तू असतात, ज्या मुलांसाठी, मुलींसाठी, बाळांसाठी किंवा ऑफिसमध्ये द्यायच्या गिफ्टसाठी योग्य आहेत. वैयक्तिक गिफ्टसाठीचा हा खास व्यवसाय धनश्री सावंत यांनी ‘माऊली सेलिब्रेशन’ या नावाने व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायात ग्राहकांच्या मागणीनुसार किंवा धनश्रींच्या आईच्या डिझाईननुसार वैयक्तिक गिफ्ट तयार केले जातात. ग्राहक हवे तसे गिफ्ट कस्टमाइज करून मिळवू शकतात.
advertisement
गिफ्टचे प्रकार
- मुलांसाठी: मेन्स किट्स, ज्यात परफ्युम्स, क्वालिटी बॉटल्स, पाकीट्स आणि लहान भेटवस्तू असतात.
- मुलींसाठी: स्टायलिश टोट बॅग्स, ड्रायफ्रूट्स आणि लहान अॅक्सेसरीज.
- बाळांसाठी: लहान बाळांसाठी खास हॅम्पर्स.
- ऑफिस किंवा इतर सणांसाठी: कॉर्पोरेट गिफ्ट किंवा व्यक्तिनिहाय हॅम्पर्स.
- किंमत – सुरुवात फक्त 75 रुपयांपासून
धनश्री सावंत यांच्या गिफ्टची किंमत खूपच परवडणारी आहे. 75 रुपयांपासून सुरू होऊन 100, 120 रुपयांपासून ते हजार-दोन हजार रुपयांपर्यंत विविध गिफ्ट प्रकार उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहक त्यांच्या बजेट आणि आवडीनुसार खास गिफ्ट सहज तयार करू शकतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 20, 2025 5:28 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
भाऊबीजेसाठी बहिणीला काय गिफ्ट द्यायचं? 'ह्या' घ्या आयडिया; 75 रुपयांपासून मिळतायत वस्तू