'पंढरपूरच्या वारीत अर्बन नक्षलवादी शिरले', शिवसेनेच्या महिला नेत्याचा दावा, वाद पेटण्याची चिन्ह!
- Published by:sachin Salve
Last Updated:
'कोणत्याही जाती धर्मावर मला टीका करायची नाही. परंतु ही मंडळी सकाळी आठ वाजता सासवड येथे पोहोचतात. त्यांच्या वारीचा संपूर्ण रूट देखील आहे.
मुंबई : पंढरपूरच्या वारीवरून समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. हा वाद शमत नाही तेच शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी नवीन आरोप केला आहे. 'पंढरपूर वारीमध्ये काही लोक असे घुसले आहेत, असे धर्माला मानत नाहीत जे देवाला मानत नाहीत. हे सगळे अर्बन नक्षलवादी आहे, यांचा बंदोबस्त केला पाहिजे, अशी मागणी कायंदे यांनी केली. त्यांच्या या मागणीमुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे.
पावसाळी अधिवेशनामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी वारीत अर्बन नक्षवादाचा मुद्दा मांडला. त्यांच्या या वक्त्यामुळे विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला.
मनिषा कायंदे काय म्हणाल्या?
'वारीमध्ये काही लोक असे घुसले आहेत असे धर्माला मानत नाहीत जे देवाला मानत नाहीत. वारीमध्ये विठ्ठलाचे भक्त मोठ्या संख्येने जातात. पंढरपूरच्या वारीमध्ये कोणी कोणाला निमंत्रण दिले नसतं पण लोक उत्स्फूर्तपणे जातात. परंतु वेगवेगळ्या बोगस नावाखाली काही संघटना जसे की संविधान दिंडी पर्यावरण दिंडी आहे. अनेक वारकरी हे बीजारोपण करत जातात. लोकायत अशी एक नावाची संघटना आहे या अशा संघटना वारीमध्ये पथनाट्य करतात, असे शो करतात. हे हिंदू धर्मीय नाही असं दिसत आहे, असा दावाचा कायंदेंनी केला.
advertisement
'कोणत्याही जाती धर्मावर मला टीका करायची नाही. परंतु ही मंडळी सकाळी आठ वाजता सासवड येथे पोहोचतात. त्यांच्या वारीचा संपूर्ण रूट देखील आहे. त्यात किंवा कोड सुद्धा आहेत जो ब्लॅकलिस्टेड आहे. त्यांना कोणाविषयी बोलायचं असेल तर ते बोलू शकतात. पण पंढरपूरच्या वारीचा अशाप्रकारे गैरफायदा ते घेत आहेत. हे डोक्यावर संविधानाचे पुस्तक घेत आहेत. अनेक वारकरी माथ्यावर तुळशीचे रोप असलेली कुंडी घेतात. तुम्हाला संविधानाचा प्रसार करायचा असेल तर तुम्ही करू शकता आम्ही सुद्धा संविधान मानतो. परंतु पंढरपूरच्या वारीमध्ये अनेक वारकरी महिला तुळशीचा रोप घेऊन चालतात. वारी हा धार्मिक विषय आहे' असंही त्या म्हणाल्या.
advertisement
'मुख्यमंत्री फडणवीस यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे की, आम्ही त्यांचा बंदोबस्त करू. युएपीए कायद्यांतर्गत काही जणांवर गुन्हे दाखल आहेत. असे लोक जे जामिनावर आहेत ते सुद्धा या प्रकारच्या वारीमध्ये घुसलेले आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली आम्ही श्रद्धावादी आहोत असं दाखवतात. अशाप्रकारे धर्माला आणि वारीला बदनाम करण्याचा हिम्मत ही मंडळी करत आहेत. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून पटलावर हा विषय मी आणला आहे. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. सहा तारखेला आषाढी एकादशी आहे. वारीचा गैरफायदा घेतला जातो आहे हाच त्यांचा उद्देश आहे. त्यांच्यावर त्वरित ॲक्शन घेतली गेली पाहिजे. यात बरीच लोक आहेत हे पोलिसांचं काम आहे त्यांना शोधून काढायचं. तुम्ही वारीचा अशाप्रकारे उपयोग करून लोकांचा बुद्धिभेद करत आहात. हे लोक पथनाट्य करून वारीबद्दल अपप्रचार करतात. जन सुरक्षा विधेयक सभागृहात लवकरच येणार आहे. त्यामुळे फेक नरेटीव्ह बसवलं जात आहे, असा दावाही त्यांनी केला.
advertisement
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर आक्षेप घेतला. 'आम्ही म्हणत होतो ना तेच झालं. मी लोकायतचा सदस्य आहे, मी संविधान दिंडीचा सदस्य आहे. मल माहिती आहे त्यांची विचारसरणी काय आहे. तुम्ही सगळ्यांना अर्बन नक्षल म्हणणार म्हणून आम्ही तुम्हाला म्हणत होतो हा शब्द काढा. हे त्यांच्या नावाखाली यांच्या विचारसरणी विरोधात असलेल्या सर्वांवर कारवाई करतील. जनसुरक्षा विधेयक यांना आणायचेच यासाठी आहे' असं आव्हाड म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 02, 2025 6:24 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
'पंढरपूरच्या वारीत अर्बन नक्षलवादी शिरले', शिवसेनेच्या महिला नेत्याचा दावा, वाद पेटण्याची चिन्ह!