कानून के हाथ बहुत लंबे! 18 वर्षांपूर्वी गुन्हा केला, देश बदलला,राज्य बदलली; त्याला वाटलं तो वाचला, पण...

Last Updated:

18 वर्षे फरार… देश बदलला,राज्य बदलली, ओळखी बदलल्या… पण गुन्हा पुसता आला नाही, वसई पोलिसांनी आरोपीच्या उत्तरप्रदेशात जात मुसक्या आवळल्या आहे.  

News18
News18
मुंबई :  महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना आणि इतर गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 'कानून के हाथ लंबे होते हैं', असं आपण ऐकलं आहे.  पण आज त्याची प्रचिती देखील आली आहे. वसई येथील पोलिसांच्या पथकाने 18 वर्ष जुन्या प्रकरणातील एका आरोपीच्या उत्तरप्रदेशात जात मुसक्या आवळल्या आहे.
माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2007 साली घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. सातिवली परिसरात राहणाऱ्या 5 वर्षांच्या गीतादेवी गौतम हिचे चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे गळा आवळून तिचा खून करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी नंदलाल उर्फ नंदू विश्वकर्मा हा गुन्हा करून फरार झाला होता.
advertisement

आरोपीला कसा आला जाळ्यात?

तब्बल 18 वर्षे हा गुन्हा उघडकीस येऊ शकला नव्हता. बलात्कार करून खून केल्यानंतर नंदलालने नेपाळ गाठले. नंदलालने त्यानंतर काही दिवस नवी मुंबईमध्ये हमालीचे काम केलं, त्यानंतर पुण्यामध्ये काम केलं. यूपी मधल्या सिद्धार्थ नगरमध्ये विट भट्टीवर आपल्या गावापासून दूर राहून काम करत होता आणि याची माहिती सहाय्यक फौजदार रवी पवार यांना मिळाली.
advertisement

समांतर तपासाने उघडकीस आले सत्य

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार उघडकीस न आलेल्या खुनांच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू करण्यात आला. गुन्हे शाखा कक्ष–2, वसई यांनी जुन्या साक्षीदारांची पुन्हा चौकशी केली, तांत्रिक विश्लेषण केले आणि गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय केले. या तपासात आरोपी उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील खरदौरी गावात शेतात विट भट्टीवर गाडी चालवण्या चेकाम करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.
advertisement

सापळा रचून अखेर अटक

पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष २ वसईचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, सफौज संतोष चव्हाण नेम सायबर पोलीस ठाणे, मिरा-भाईंदर, वसई विरार, पोलीस आयुक्तालय यांनी सापळा रचून उत्तरप्रदेशात जाऊन 10 डिसेंबर 2025  रोजी आरोपी नंदलाल विश्वकर्मा याला अखेर अटक करण्यात आली.
advertisement

18 वर्षांनंतर पीडितेला न्याय

या अटकेने एक गोष्ट पुन्हा सिद्ध झाली आहे. कायदा उशिरा का होईना, पण दोषींना सोडत नाही.18 वर्षांचा काळ गेला… पण न्याय हरवला नाही. हा गुन्हा केवळ उकल नाही, तर कायद्याच्या ताकदीचा ठोस संदेश आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
कानून के हाथ बहुत लंबे! 18 वर्षांपूर्वी गुन्हा केला, देश बदलला,राज्य बदलली; त्याला वाटलं तो वाचला, पण...
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement