Vasai Virar Election 2026 : नालासोपाऱ्यात खाजगी कारमध्ये 3 बॅलेट, कंट्रोल मशीन सापडल्याचा धक्कादायक प्रकार,नेमकं काय घडलं?

Last Updated:

नालासोपाऱ्यात खाजगी कारमध्ये 3 बॅलेट मशीन एक कंट्रोल मशीन सापडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर माजी आमदार क्षितीज ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संबंधित खाजगी गाडी अडवून निवडणूक कर्मचाऱ्याला जाब विचारायला सुरूवात केली आहे.

vasai virar election 2026
vasai virar election 2026
Vasai Virar Election 2026 : विजय देसाई, प्रतिनिधी वसई-विरार : वसई विरारमध्ये मतदानाचा कालावधी संपत आला असताना नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नालासोपाऱ्यात खाजगी कारमध्ये 3 बॅलेट मशीन एक कंट्रोल मशीन सापडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर माजी आमदार क्षितीज ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संबंधित खाजगी गाडी अडवून निवडणूक कर्मचाऱ्याला जाब विचारायला सुरूवात केली आहे.पण निवडणूक कर्मचाऱ्याला व्यवस्थित उत्तर देता येत नसल्याची बाब समोर आली आहे
मिळालेल्या माहितीनुसार एका खाजगी कारमधून 3 बॅलेट मशीन एक कंट्रोल मशीन घेऊन जात असल्याची बाब बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी संबंधित गाडी अडवली.त्यानंतर क्षितीज ठाकूर यांनी घटनास्थळी दाखल होऊन संबंधित गाडीतील बॅलेट मशीन आणि कंट्रोल मशीन बाबत विचारपूस केली होती. यावेळी या मशीन खराब झाल्यामुळे घेऊन जात असल्याचे निवडणूक कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र बॅलेट मशीन स्ट्रॉग रूममध्ये किंवा स्टोर रूममध्ये ठेवण्याची पद्धत असताना या मशीन्स मतदानाच्या दिवशी असा खाजगी वाहनातून नेली जात असल्याने नागरीकांमध्ये संशय निर्माण झाला होता.
advertisement
दरम्यान या प्रकरणात क्षितीज ठाकूर यांनी संबंधिक कर्मचाऱ्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली होती.मात्र कर्मचाऱ्याला मशीन्सचा रेकॉर्ड आणि अनेक प्रश्नांची योग्य उत्तर देता आली नव्हती. भररस्त्यात हा संपूर्ण प्रकार घडला होता. त्यामुळे घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. तसेच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता. या घडनेने नागरीकांमध्ये मोठा संशय निर्माण झाला होता.
advertisement
वसई विरार मतदान अपडेट
सकाळी ९.३० पर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी- ८.४९%
सकाळी ११.३० पर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी- १९.३४%
दुपारी १.३० पर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी- ३३.००%
दुपारी ३.३० पर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी- ४५.६९%
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Vasai Virar Election 2026 : नालासोपाऱ्यात खाजगी कारमध्ये 3 बॅलेट, कंट्रोल मशीन सापडल्याचा धक्कादायक प्रकार,नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement