Vasai Virar Election : मुंबईपेक्षा वसई विरारचे उमेदवार श्रीमंत, दोघांना तर कुबेर प्रसन्न, संपत्तीचे आकडे वाचून शॉक व्हाल

Last Updated:

वसई विरारमधील बहुजन विकास आघाडीचे दोन उमेदवार अब्जाधीश आहेत, तर 30 हुन अधिक उमेदवार हे करोडपती आहेत.त्यामुळे हे उमेदवार कोण आहेत? आणि त्यांच्या नावावर कितीची संपत्ती आहे? हे जाणून घेऊयात.

Vasai Virar Election
Vasai Virar Election
Vasai Virar Mahanagar Palika Election : वसई विरार महानगरपालिका निवडणुकीत हळू हळू वातावरण तापायला सूरूवात झाली आहे. प्रत्येक पक्षाचे उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना आता अनेक उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे. त्यात वसई विरारमधील बहुजन विकास आघाडीचे दोन उमेदवार अब्जाधीश आहेत, तर 30 हुन अधिक उमेदवार हे करोडपती आहेत.त्यामुळे हे उमेदवार कोण आहेत? आणि त्यांच्या नावावर कितीची संपत्ती आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
वसई विरार महानगरपालिकेच्या 115 जागांसाठी 557 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांपैकी वेगवेगळ्या पक्षाचे साधारण 30 हून अधिक उमेदवार हे करोडपती आहेत. तर बहुजन विकास आघाडीचे अजिव पाटील 291.65 करोड संपत्तीसह महापालिकेतील सर्वांत श्रीमंत उमेदवार आहे. त्यांच्या पाठोपाठ बहुजन विकास आघाडीचेच पंकज ठाकूर देखील 143 करोड संपत्तीसह दुसरे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.
advertisement
या दोन श्रीमंत उमेदवारांसोबत बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांच्याकडे 18 करोड रूपये इतकी संपत्ती आहे. प्रफुल्ल साने यांची संपत्ती 30 करोड इतकी आहे.त्याचसोबत बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी झालेले शेखर धुरी यांनी यांच्याकडे 30 कोटीची संपत्ती आहे.प्रशांत राऊत यांच्याकडे 1 कोटीची संपत्ती आहे. कल्पेश मानकर यांच्याकडे 14 करोड संपत्ती आहे.
advertisement
हितेंद्र ठाकूर यांचे कट्टर विरोधक पण यंदाच्या निवडणुकीत मैत्रीचा हात पुढे करत बविआच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या धनंजय गावडे यांच्याकडे 18 करोडची संपत्ती आहे. किरण ठाकूर यांच्याकडे 21 करोडची संपत्ती आहे.सुवर्णा पाटील या 11 करोडच्या संपत्तीच्या मालकीण आहेत.
advertisement
भाजपचे हे उमेदवार आहेत श्रीमंत
भाजपचे देखील अनेक उमेदवार श्रीमंत आहेत. महेश पाटील यांची एकूण संपत्ती 73.63 करोड रुपये आहेत. आणि मनोज पाटील यांची संपत्ती 8 करोड रूपये आहेत. हे सगळे संपत्तीचे आकडे प्रत्येक उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रात लिहले गेले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Vasai Virar Election : मुंबईपेक्षा वसई विरारचे उमेदवार श्रीमंत, दोघांना तर कुबेर प्रसन्न, संपत्तीचे आकडे वाचून शॉक व्हाल
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement