मुंबईच्या समुद्रात पहिल्यांदाच असं दृश्य, बोटीही पुढे जाईना, रिंगणाचं गुढ काय? VIDEO

Last Updated:

वसईच्या समुद्र किनाऱ्यातून एक वेगळंच दृष्य समोर आलं होतं. हे दृष्य पाहून बोटी पुढे जाईनात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मच्छिमारांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

Vasai Virar Mysterious circular spotted : विजय देसाई, प्रतिनिधी, वसई विरार : मुंबईपासून जवळच असणाऱ्या वसई विरारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. वसईच्या समुद्र किनाऱ्यातून एक वेगळंच दृष्य समोर आलं होतं. हे दृष्य पाहून बोटी पुढे जाईनात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मच्छिमारांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे हे दृष्य म्हणजे समुद्राच्या मध्यभागी तयार झालेले गोल रिंगण आहे. हे गोल रिंगण नेमकं कशामुळे समुद्रात तयार झाले आहे? या रिंगणाच रहस्य काय आहे?याचा अद्याप उलगडा होऊ शकला नाही आहे. पण या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
वसईच्या समुद्र किनाऱ्यापासून 66 नोटिकल अंतरावर मागील दहा दिवसांपासून समुद्रात गोल रिंगण तयार झाले असल्याचे दिसून आले आहे. यामुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खरं तर या घटनेचा पहिला व्हिडिओ हा 11 जानेवारीला समोर आला होता.या घटनेनंतर सर्वच यंत्रणा सजग झाल्या होत्या.परंतु या घटनेला सात दिवसाचा अवधी उलटून देखील या गोल रिंगणा रहस्य काय उलगडायला तयार नाही आहे.
advertisement
वसईतील पाचुबंदर येथील 'ओम नमः शिवाय' ही कृष्णा मोरलीखांड्या यांच्या मालकीची मच्छीमार नौका समुद्रात मासेमारीसाठी निघाली होती. पण जीपीएस क्रमांक ३०-१५-५५४, ७१-५८-५७६ याठिकाणी मोठे गोलाकार रिंगण (वर्तुळ) वर्तुळ तयार झाले होते. त्यातून मातकट रंगाचे पाणी वेगाने निघत असल्याचे निदर्शनास आले होते. या रिंगणात दरम्यान बोट या ठिकाणी अडकली होती. नंतर इंजिनाचा वेग वाढवून मच्छीमारांनी बोट बाहेर काढून त्वरित मत्स्य अधिकारी, तटरक्षक, नौदलाला या घटनेची माहिती दिली होती.
advertisement
या घटनेनंतर मच्छिमार बांधवांनी ती ज्वालामुखी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कारण पालघर जिल्हा हा भूकंपप्रवण क्षेत्र आहे. दरवर्षी 200 हून अधिक सौम्य भूकंप होतात, म्हणून आपत्ती विभागाकडूनही तपासणी करावी अशी मागणी समुद्र जीव रक्षक जनार्दन मेहेर यांनी केली आहे. मात्र या घटनेची दखल कोणत्याही यंत्रणेने न घेतल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईच्या समुद्रात पहिल्यांदाच असं दृश्य, बोटीही पुढे जाईना, रिंगणाचं गुढ काय? VIDEO
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement