Ajit Pawar : अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं, पण विलासराव बेस्ट, अजित पवारांनी केलं कौतुक
- Published by:Suraj
Last Updated:
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचं कौतुक केलंय. तसंच मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतही ते बोलले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठं विधान केलंय. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं कौतुक अजित पवार यांनी केलं. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांना शरद पवारांसोबतचे मतभेद आणि कौटुंबिक राजकारण याबद्दलही विचारण्यात आलं. शरद पवारांसोबतच्या मतभेदावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मला कौटुंबिक मुद्द्यावर काही बोलायचं नाहीय. त्यावर काही बोलणार नाही. माझं पूर्ण लक्ष विधानसभा निवडणुकीवर हवं.
अजित पवार यांनी म्हटलं की, मी अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं. मला वाटतं दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले विलासराव देशमुख सर्वात चांगले मुख्यमंत्री होते. आपण आता युती आघाडी सरकारच्या काळात आहोत. राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर एका पक्षाचं सरकार येण्याची शक्यता नाही. देशमुख यांनी आघाडी सरकार चालवण्याचं धोरण विकसित केलं होतं.
महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले की, मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. मुख्यमंत्र्याचा निर्णय निवडणूक निकालानंतर महायुतीच्या आमदारांच्या बैठकीत होईल.
advertisement
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी निराशाजनक अशी होती. चार जागांपैकी त्यांना फक्त एकच जागा जिंकता आली. यावर अजित पवार म्हणाले की, लोकसभेनंतर परिस्थिती बदललीय. मतदार आता महायुतीला मतदान देतील. लोकांना जाणीव झालीय की फक्त महायुतीच चांगलं करू शकते. लोकसभेवेळी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा होता पण आता परिस्थिती बदललीय. महायुतीची कामगिरी चांगली करण्यास मदत होईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2024 10:15 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ajit Pawar : अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं, पण विलासराव बेस्ट, अजित पवारांनी केलं कौतुक


