Baba Siddiqui firing : बाबा सिद्दिकींवर फायरिंगपूर्वी शेवटच्या दहा मिनिटांत काय घडलं? ज्या तरुणाला गोळी लागली त्यानं सांगितलं

Last Updated:

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात दोन आरोपींनी अटक करण्यात आली आहे.

News18
News18
प्रिती सोमपुरा, प्रतिनिधी : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. सिद्दिकी हे आपला मुलगा आणि आमदार जिशान सिद्दिकी यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यलयात आले होते. याचवेळी ही घटना घडली. या घटनेत बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे. गोळीबारानंतर पळून जाण्याच्या तयारीत असताना दोन आरोपींना पोलिसांनी पकडलं, मात्र एक आरोपी गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला.
दरम्यान जेव्हा बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला, त्याचवेळी आणखी एक तरुणाच्या पायाला गोळी लागली होती. राज कनौजिया वय 22 वर्ष असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाला जखमी अवस्थेमध्ये पोलिसांनी बांद्रा येथील रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या पायाचं ऑपरेशन करण्यात आलं आहे. त्या दिवशी घटनास्थळी नेमकं काय घडलं हे राज कनौजिया यांनं सांगितलं.
advertisement
राज याने दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी दसरा असल्यानं त्याला सुट्टी होती. तो एका दुकानामध्ये शिवणकाम करतो. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मी देवीचं दर्शन घेऊन घराकडे परतत होतो. त्यावेळी मी तिथे ज्यूस पिण्यासाठी थांबलो. मात्र थोड्याचवेळात घटनास्थळी अचानक गोंधळ उडाला. माझ्या पायाला कसली तरी दुखापत झाल्याचं मला जाणवलं. मी पाहिलं तर पायातून रक्त येत होतं. मला वाटलं की तिथे काही जण फटाके फोडत होते, त्यातील एखादा फटाका अंगावर आला असेल. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी मला मंदिरात नेलं. तिथे मला कळालं की गोळी लागली आहे. त्यानंतर माला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, असं राज याने सांगितलं आहे. राजचं फेब्रुवारी महिण्यात लग्न होणार असून, त्याने प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Baba Siddiqui firing : बाबा सिद्दिकींवर फायरिंगपूर्वी शेवटच्या दहा मिनिटांत काय घडलं? ज्या तरुणाला गोळी लागली त्यानं सांगितलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement