बाबा सिद्दिकींची सुपारी कोणी दिली? पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर, हत्येचं दाऊद इब्राहिम कनेक्शन
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
चार दिवसांपूर्वी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई, प्रतिनिधी : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गेल्या आठवड्यात गोळीबार करण्यात आला, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान बाबा सिद्दिकी यांची हत्या का करण्यात आली? त्यांच्या हत्येमागचा उद्देश काय होता? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणात आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कनेक्शन देखील समोर आलं आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली आहे की बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यामागे अभिनेता सलमान खानच्या मनात आणि मुंबईमध्ये दहशत निर्माण करण्याचा उद्देश होता. सोबतच या निमित्तानं दाऊद इब्राहिमपर्यंत संदेश पोहोचवायचा होता.
मुंबई पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणात दाऊद कनेक्शन समोर आलं आहे, त्या अँगलने देखील तपास सुरू आहे. 28 दिवसांमध्ये या प्रकरणातील शूर्टर्सनी पाचवेळा सिद्दिकी यांच्या घर आणि कार्यालयाची रेकी केली. ते बाबा सिद्दिकी यांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते. शेवटी त्यांनी गोळीबारासाठी दसऱ्याचा दिवस निवडला. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार झिशान अख्तर हा मुंबईबाहेर होता. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो मुंबईच्या बाहेर बसून हे सर्व ऑपरेशन चालवत होता. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी लागणारे सर्व शस्त्र हे पजांबमधून आल्याची माहिती देखील समोर आली आहे.
advertisement
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणारा आरोपी शिवकुमार गौतम याला लॉरेंस बिश्नोई गँगकडून टेलीग्राम आणि स्नॅपचॅटवर आदेश मिळत होते. शिवकुमार गौतम याला बिश्नोई गँगनेच गोळीबाराचा आदेश दिला होता. बिश्नोई गँगकडून जे आदेश मिळत होते, तो ते आदेश आपल्या इतर शूटरपर्यंत पोहोचवत होता. प्लॅनिंग करतानाच त्याला टारगेटबाबत सगळी माहिती सांगण्यात आली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2024 1:17 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
बाबा सिद्दिकींची सुपारी कोणी दिली? पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर, हत्येचं दाऊद इब्राहिम कनेक्शन