शिक्षकाने शूजच्या बॉक्स, देवघरात लपवले इतके कोटी; घरातील पैसा पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली

Last Updated:

Cash Seized: बालुरघाट आणि गंगरमपुर येथे पोलिसांनी अपूर्व सरकार यांच्या घरातून 1.35 कोटी रुपये जप्त करून ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश केला.

News18
News18
कोलकाता: पश्चिम बंगालमधील बालुरघाट आणि गंगरमपुर येथे पोलिसांनी एका मोठ्या आणि अवैध जुगाराच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात नया बाजार हायस्कूलचे शिक्षक अपूर्व सरकार यांच्या घरातून कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
advertisement
रविवारी संध्याकाळी बालुरघाट येथील रघुनाथपूर येथील सरकार यांच्या सासरच्या घरातून पोलिसांनी 1.17  कोटी रुपये रोख जप्त केले. ही रक्कम शूजच्या बॉक्समध्ये आणि देवाच्या खोलीत (ठाकूर घर) लपवून ठेवण्यात आली होती. त्यानंतर गंगरमपुर येथील त्यांच्या स्वतःच्या घरातूनही 18 लाख रुपये रोख रक्कम मिळाली.
advertisement
ऑनलाइन बेटिंग रॅकेटशी संबंध
पोलिसांनी सांगितले की- अपूर्व सरकार यांचा ऑनलाइन बेटिंग रॅकेटशी संबंध असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 14 लोकांना अटक करण्यात आली आहे. तपासानंतर आतापर्यंत एकूण 1.35 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तपास अजूनही सुरू आहे आणि या रॅकेटमधील इतर लोकांचे संबंध आणि अतिरिक्त रोख रकमेचा शोध घेतला जात आहे. पश्चिम बंगालमधील जुगाराच्या प्रकरणांपैकी हा एक सर्वात मोठा पर्दाफाश मानला जात आहे.
advertisement
या घटनेमुळे भागात मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या जुगाराचा खुलासा झाला आहे आणि पोलीस या बेकायदेशीर कामातील इतर सदस्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. यात सहभागी असलेल्या लोकांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे आणि पुढील तपासामुळे या नेटवर्कच्या अधिक खोलातील माहिती उघड होऊ शकते.
advertisement
view comments
मराठी बातम्या/देश/
शिक्षकाने शूजच्या बॉक्स, देवघरात लपवले इतके कोटी; घरातील पैसा पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement