एकाच बॅचचे 4 डॉक्टर; अचानक चौघांचाही मृत्यू, पोलीस तपासात समोर आलं सत्य
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
कटरच्या मदतीने कारचे दरवाजे तोडून आणि काचा बाजूला करून चारही तरुणांना बाहेर काढण्यात आले आणि तात्काळ स्थानिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना जागीच मृत घोषित केले.
नियतीचा क्रूर आघात! डॉक्टर बनण्याच्या मार्गावर असलेल्या ४ विद्यार्थ्यांचा अंत झाला. एकाच वेळी चौघांचा मृत्यू झाला अन् त्यासोबत त्यांच्या स्वप्नांचाही चुराडा झाला. एका गोष्टीनं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि होत्याचं नव्हतं झालं. चौघांचाही जागीच मृत्यू झाला. 2020 च्या बॅचचे चौघे होते, ते इंटर्नशिप करत होते, मात्र अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला, तर चार डॉक्टर गमावल्याचंही दु:ख आहे.
उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील नॅशनल हायवे-९ वर झालेल्या एका भीषण अपघाताने चार होतकरू तरुणांचे आयुष्य एका क्षणात हिरावून घेतले. हे चारही विद्यार्थी डॉक्टर बनण्याच्या अंतिम टप्प्यावर होते, इंटर्नशिप करत होते आणि मध्यरात्री आपल्या युनिव्हर्सिटीकडे परतत होते. मात्र, रजबपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्त्यावर उभ्या असलेल्या एका डीसीएम ट्रकला त्यांच्या भरधाव कारने जोरदार धडक दिली आणि घात झाला.
advertisement

रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. हायवेच्या सर्व्हिस लेनवर एक डीसीएम ट्रक उभा होता. रस्ता निर्मनुष्य असल्याने वाहनांची गती सामान्य होती. त्याचवेळी वेगाने येणारी स्विफ्ट डिझायर कार थेट ट्रकला जाऊन धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, आजूबाजूच्या घरातून लोक घाबरून बाहेर आले. अपघातस्थळी काही क्षणांतच लोक जमले, पण कारचे दृश्य पाहून मदतीसाठी धावण्याचीही कोणाची हिंमत होईना. कारचा पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता, दरवाजे आतमध्ये दाबले गेले होते आणि चारही तरुण तिथेच अडकले होते. तिथे कसलीही हालचाल नव्हती; अक्षरश: ही दृश्यं पाहून अंगावर काटा आला.
advertisement
अपघात होताच, ग्रामस्थांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. कटरच्या मदतीने कारचे दरवाजे तोडून आणि काचा बाजूला करून चारही तरुणांना बाहेर काढण्यात आले आणि तात्काळ स्थानिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना जागीच मृत घोषित केले. मृत विद्यार्थ्यांची ओळख आयुष शर्मा (दिल्ली), सप्तऋषि दास (त्रिपुरा), अरनब चक्रवर्ती (त्रिपुरा) आणि श्रेयस पंचोली (गुजरात) अशी पटली. हे चौघेही एका खासगी युनिव्हर्सिटीच्या एमबीबीएस २०२० बॅचचे विद्यार्थी होते आणि सध्या इंटर्नशिप करत होते.
advertisement

या घटनेची माहिती युनिव्हर्सिटी प्रशासनाला मिळताच अधिकारी रुग्णालयात पोहोचले. कुलगुरूंनी मृतदेहांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांना ही बातमी दिली. ज्याक्षणी कुटुंबीयांना ही माहिती मिळाली, त्यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती. कुटुंबियांनी देखील आक्रोश केला. या अपघाताचं अद्याप कारण समजू शकलं नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Madhya Pradesh
First Published :
December 04, 2025 1:12 PM IST


