Accident News : भरधाव वेगात कार धडकली विजेच्या खांबाला, 4 तरुणांचा जागीच मृत्यू
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
भीषण अपघात डुमरदगाला जाणाऱ्या मार्गावर झाला. अपघातग्रस्त कारचा वेग जास्त होता अशी स्थानिकांनी माहिती दिली.
रांची, 28 डिसेंबर : झारखंडची राजधानी रांचीमध्ये वेगवान कारचा अपघात होऊन चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. चालक कार भरधाव वेगाने चालवत होता आणि कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समजते. भरधाव कार खांबाला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कार पलटली. यात चारही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भीषण अपघात डुमरदगाला जाणाऱ्या मार्गावर झाला. अपघातग्रस्त कारचा वेग जास्त होता अशी स्थानिकांनी माहिती दिली. कार अनियंत्रित झाल्यानंतर खांबाला धडकली. त्यानंतर कार पलटी झाली. यात चारही तरुणांचा मृत्यू झाला.
Four people died in a road accident in the Sadar Police Station area of Ranchi last night. The car went uncontrolled, hit an electric pole and then overturned. Bodies have been sent for postmortem. An investigation is underway: Ranchi Police
— ANI (@ANI) December 28, 2023
advertisement
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची नोंद पोलीसात करण्यात आली असून चौकशी केली जात आहे. अपघात होऊ नयेत यासाठी वेळोवेळी वाहतूक विभागाकडून जागरुकता मोहिम राबवण्यात येते. मात्र तरीही भरधाव वेग आणि नियम न पाळल्याने अपघात होत आहेत.
याआधी रांचीतील ओरमांझी इथं उकरीदजवळ अपघात झाला होता. जमशेदपूरहून आराला जाणाऱ्या बसने मागून धडक दिली होती. यात बसचा पुढच्या भागाचा चक्काचूर झाला होता. तर एकाचा मृत्यू झाला होता. गेल्या आठवड्यात रांचीतच दोन वाहनांच्या भीषण धडकेत दोन तरुण ठार झाले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 28, 2023 8:30 AM IST