How's The Josh! 6 वेळा 'फेल' सातव्यांदा भेदलं 'लक्ष्य'; शिपाई बनला आर्मी ऑफिसर

Last Updated:

Indian Army Jawan Success Story : प्रत्येक वेळी अपयश आलं पण त्यांनी हार मानली नाही. त्यांच्यासाठी अपयश हे कधीच थांबण्याचं कारण नव्हतं. उलट अपयशामुळे त्यांची ध्येय साध्य करण्याची जिद्द अधिकच वाढत गेली.

News18
News18
अपयश ही यशाची पायरी आहे, असं म्हणतात. हे सिद्ध करून दाखवलं ते 32 वर्षांचे गुरूमख सिंग यांनी... बारावी झाल्यानंतर ते भारतीय सैन्यात शिपाई म्हणून रूजू झाले. पण त्यांना व्हायचं होतं आर्मी ऑफिसर. एक दिवस अधिकारी व्हायचं हे स्वप्न मनाशी बाळगूनच त्यांनी आपली वाटचाल सुरू केली. एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल 6 वेळा ते फेल झाले. पण त्यांनी हार मानली नाही. या अपयशालाच जिद्द बनवलं आणि शेवटी सातव्यांदा त्यांनी यशाची पायरी गाठली.
गुरूमख सिंग बारावी झाल्यानंतर सैन्यात भरती झाले ते शिपाई म्हणून.  लडाखसारख्या कठीण ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली. तिथं ड्युटी बजावताना शिपाई ते ऑफिसर होण्याचं स्वप्न साकार करणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. पण लडाखसारख्या ठिकाणी पोस्टिंगमध्ये सेवा करत असतानाही त्यांनी आपली शैक्षणिक पात्रता सातत्याने वाढवत ठेवली. त्यांनी पदव्युत्तर पदवी तसंच बी.एड ही पदवीही मिळवली. हे सगळं त्यांनी सैन्यात अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच केलं. त्यांनी आपल्या प्रवासाचं वर्णन करताना सांगितलं की, कर्तव्य बजावत असताना परीक्षेच्या तयारीचा समतोल साधणं ही सततची आणि कठीण आव्हानात्मक प्रक्रिया होती.
advertisement
गुरुमुख सिंग यांनी आपलं ध्येय गाठण्यासाठी अनेक प्रवेश मार्ग अवलंबले. त्यांनी आर्मी कॅडेट कॉलेज (ACC) प्रवेश परीक्षा तीन वेळा दिली, पण त्यांना यश आलं नाही. त्यानंतर त्यांनी स्पेशल कमिशन्ड ऑफिसर्स (SCO) प्रवेश परीक्षा दोनदा दिली, दोन्ही वेळा अपयशी ते ठरले.
advertisement
प्रत्येक वेळी अपयश आलं पण त्यांनी हार मानली नाही. त्यांच्यासाठी अपयश हे कधीच थांबण्याचं कारण नव्हतं. उलट अपयशामुळे त्यांची ध्येय साध्य करण्याची जिद्द अधिकच वाढत गेली. ते म्हणाले, "प्रत्येक वेळी मी अपयशी ठरलो, तेव्हा मी माझ्या वडिलांना सांगायचो, त्यांच्याशी बोलायचो. त्यांनी कधीही माझ्यावरचा विश्वास गमावला नाही. माझं ध्येय साध्य होईपर्यंत पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहण्यासाठी त्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलं"
advertisement
वारंवार अपयश येऊनही त्यांनी विविध अधिकारी भरती परीक्षांना बसणं सुरूच ठेवलं. अखेर सातव्या प्रयत्नात ते IMA परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली. डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये त्यांनी अधिकाऱ्याचा गणवेश घातला. लेफ्टनंट गुरमुख सिंग यांची नियुक्ती आर्मी एअर डिफेन्स (AAD) कॉर्प्स मध्ये झाली आहे.
advertisement
त्यांचे वडील रिटायर्ड सुभेदार जसवंत सिंग आणि आई कुलवंत कौर हे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी समारंभात उपस्थित होते. त्यांच्या वडिलांनी सांगितलं की, गुरुमुखला सैन्यात सामील झाल्यापासूनच अधिकारी होण्याची आवड होती.
लेफ्टनंट गुरुमुख सिंग यांना विश्वास आहे की सैनिक म्हणून त्यांचा वर्षानुवर्षेचा अनुभव त्यांना त्यांच्या नेतृत्वात मदत करेल. सैन्य कसं काम करतं आणि सैनिकांचं व्यवस्थापन कसं करावं, याची माहिती त्यांना आहे. सैनिकांचं नेतृत्व करणं त्यांच्याकडे स्वाभाविकपणे येतं आणि ते पूर्ण वचनबद्धतेने ते पूर्ण करतील.
advertisement
लेफ्टनंट गुरुमुख सिंग यांची कहाणी भारतीय सैन्यातील प्रत्येक सैनिकासाठी प्रेरणादायी आहे. दृढनिश्चय आणि शिस्तीने कोणतेही ध्येय साध्य करता येतं, हे त्यांनी दाखवून दिलं आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
How's The Josh! 6 वेळा 'फेल' सातव्यांदा भेदलं 'लक्ष्य'; शिपाई बनला आर्मी ऑफिसर
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement