Sonam Wangchuk Arrested: लडाखच्या रँचोला अटक, धक्कादायक कारण समोर; भाषणात नेमकं काय होतं? 4 जणांच्या मृत्यूनंतर मोठी कारवाई

Last Updated:

Activist Sonam Wangchuk: लडाखमधील आंदोलन हिंसक वळण घेताच सोनम वांगचुक यांना अटक झाली. 4 जणांचा मृत्यू, 90 हून अधिक जखमी आणि राज्याच्या मागणीवरून मोठा राजकीय वाद पेटला आहे.

News18
News18
लेह: शिक्षण सुधारक आणि अभियंता  सोनम वांगचुक यांना शुक्रवारी (26 सप्टेंबर) लेह पोलिसांनी अटक केली. काही दिवसांपूर्वी लडाखमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनात 4 जणांचा मृत्यू झाला होता आणि 90 हून अधिक लोक जखमी झाले होते. वांगचुक यांनी केलेल्या उत्तेजक विधानांमुळे लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांनी लडाखला सहाव्या अनुसूचीमध्ये (Sixth Schedule) समाविष्ट करण्यासाठी आणि राज्याचा दर्जा देण्यासाठी आंदोलन सुरू केले होते.
advertisement
भूकंप ठरलेले आंदोलन
लडाखच्या पूर्ण राज्यत्वासाठी आणि सहाव्या अनुसूचीखाली समावेशासाठी वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली लेह एपेक्स बॉडी (Leh Apex Body) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (Kargil Democratic Alliance) यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू केले.
advertisement
या मागण्यांसाठी दबाव आणण्यासाठी वांगचुक यांनी 10 सप्टेंबर 2025 रोजी उपोषण सुरू केले होते. मात्र वाढत्या हिंसाचारामुळे त्यांनी हे उपोषण 15 दिवसांनी म्हणजे 24 सप्टेंबर रोजी संपवले.
आंदोलनानंतर राजकीय वाद
वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन हिंसक झाल्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. सरकारने वांगचुक यांच्यावर उत्तेजक भाषणांद्वारे लोकांना भडकवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी अरब स्प्रिंग-स्टाईल आंदोलन आणि नेपाळमधील जनरेशन Z आंदोलन यांचा संदर्भ दिला होता. सरकारच्या मते या विधानांमुळे जमाव हिंसक बनला.
advertisement
गृहमंत्रालयाचे विधान
बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिकृत निवेदन जारी केले. त्यात म्हटले आहे की, 10 सप्टेंबर रोजी सोनम वांगचुक यांनी लडाखला सहाव्या अनुसूचीमध्ये आणण्याची आणि राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत उपोषण सुरू केले.
गृहमंत्रालयाने पुढे स्पष्ट केले की- भारत सरकार या मुद्द्यांवर लेह एपेक्स बॉडी (ABL) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (KDA) यांच्याशी सक्रिय संवाद साधत आहे. यासाठी उच्चस्तरीय समिती तसेच उप-समितीमार्फत औपचारिक बैठका घेण्यात आल्या आहेत. शिवाय अनेक वेळा नेत्यांशी अनौपचारिक चर्चा देखील करण्यात आली.
advertisement
मराठी बातम्या/देश/
Sonam Wangchuk Arrested: लडाखच्या रँचोला अटक, धक्कादायक कारण समोर; भाषणात नेमकं काय होतं? 4 जणांच्या मृत्यूनंतर मोठी कारवाई
Next Article
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement